फक्त महिलांनाच नाही तर, प्राण्यांना देखील येते मासिक पाळी

महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. यादरम्यान महिलांना अनेक वेदना सहन कराव्या लागतात. पण थक्क करणारी एक गोष्ट म्हणजे महिलांप्रमाणे काही प्राण्यांना देखील मासिक पाळी येते. एवढंच नाही तर, यातील काही प्राण्यांचं सायकल देखील महिलांप्रमाणे असतं... तर त्या प्राण्यांबद्दल जाणून घेऊ...

| Updated on: Apr 21, 2025 | 12:36 PM
1 / 5
रिपोर्टनुसार, मानवांप्रमाणेच काही सस्तन प्राण्यांमध्येही मासिक पाळी येते, जे प्राइमेट्स श्रेणीत येतात. सांगायचं झालं तर, मानव देखील या श्रेणीत येतात.

2 / 5
 रीसस मकाक : जे पश्चिम आशियात आढळतात. मादी रीसस माकडांनाही मासिक पाळी येते. वैज्ञानिक संशोधनानुसार, त्यांचे मासिक पाळीचे चक्र सरासरी 28 दिवसांचे असते, जे मानवी जीवशास्त्रासारखेच असते.

3 / 5
 माकडांच्या प्रजातीतील बबून माकडांना देखील मासिक पाळी येते. मादी बबून्सचे मासिक पाळीचे चक्र स्त्रियांसारखेच असते, पण त्यांचा कालावधी थोडा वेगळा असतो. बबून माकडांचं मासिक पाळीचं चक्र 33 दिवसांचं असतं. जे महिलांपेक्षा थोडं अधिक आहे.

4 / 5
 चिंपांझींनाही मासिक पाळी येते. पण त्यांचे मासिक चक्र हे इतरांपेक्षा थोडं वेगळं असतं. काहींसाठी ते 28 दिवस असतं तर काहींसाठी 45 दिवस. रिपोर्टनुसार, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मादी चिंपांझींना सुमारे 60 वर्षांच्या वयापर्यंत मासिक पाळी येते.

5 / 5
 काही प्राण्यांना मासिक पाळी दरम्यान महिलांप्रमाणे वेदना होतात. चिंपांझी आणि माकडांमध्ये थोडेफार वर्तनात्मक बदल दिसून आले आहेत. परंतु मानवांमध्ये वेदना, मूड स्विंग आणि हार्मोनल प्रभाव अधिक स्पष्टपणे दिसून येतात.