Bollywood Stars Education : बॉलिवूडमध्ये हिट, पण शिक्षणात..; काहींनी तर कॉलेजचं तोंडही नाही पाहिलं, एकतर बारावी फेल !

These Bollywood stars are less educated : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं नाही. असं असूनही, आज ते फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. या यादीत तुमच्या आवडत्या कलाकाराचंही नाव आहे का ?

| Updated on: Apr 23, 2026 | 1:28 PM
1 / 7
बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत ज्यांनी त्यांचं शालेय शिक्षणही पूर्ण केले नाही, मात्र असं असलं तरी त्यांच्या अभिनयाने, कामाने छाप सोडत जागतिक स्तरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.   या यादीत सलमान खानपासून ते आलिया भट्टपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.  या कलाकारांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी शाळा किंवा कॉलेज सोडलं , ते पुन्हा तिकडे फिरकलेच नाहीत.  पण कठोर परिश्रम, प्रतिभा व डेडिकेशनच्या जोरावर ते यशाच्या शिखरावर पोहोचले. आज आपण अशा काही बॉलिवूड स्टार्सबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्याकडे शिक्षणाची डिग्री नसतानाही त्यांनी यशाचं नव शिखर गाठलं. ( Photos - Social Media)

2 / 7

बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, पण तो त्याचं शिक्षण पूर्ण करू शकला नाही. असं असलं तरीही सलमान खान अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे.

3 / 7

या यादीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचाही समावेश आहे. बारावीत नापास झाल्यानंतर तिने शिक्षण सोडून मॉडेलिंग करण्यासाठी दिल्लीच्या दिशेने प्रयाण केलं. आज ती बॉलिवूडमधील एका नामांकित अभिनेत्री तर आहेच पण खासदार बनून राजकारणातही कार्यरत आहे.

4 / 7

अभिनेता रणबीर कपूरने एका मुलाखतीत स्वत: उघडपणे कबूल केलं होतं की तो अभ्यासात कधीच हुशार नव्हता. जेव्हा तो दहावी पास झाला, तेव्हा संपूर्ण कपूर कुटुंबाने त्याच्यासाठी पार्टी दिली होती. खरं तर, दहावीची बोर्डाची परीक्षा पास होणारा, रणबीर कपूर हा कपूर कुटुंबातील पहिलाच मुलगा होता.

5 / 7

पती रणबीर प्रमाणेच, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनेही शिक्षण पूर्ण केलेलं नाही. आलिया भट्ट जमनाबाई नरसी शाळेत शिकली आणि नंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडलं. 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटात काम करण्यासाठी तिने बारावीची परीक्षा दिली नाहीत आणि शिक्षणचं सोडून दिलं.

6 / 7

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने अभ्यासापेक्षा आपल्या आवडीला प्राधान्य दिले. त्याने मुंबईच्या गुरु नानक खालसा कॉलेजमधून शिक्षण अर्धवट सोडलं आणि मार्शल आर्ट्समध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी तो बँकॉकला गेला. त्यामुळे त्याचं शिक्षणही पूर्ण झालेलं नाही.

7 / 7

अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही शिक्षणात विशेष रस नव्हता. तिने पदवीसाठी इग्नूमध्ये प्रवेश घेतला, पण मॉडेलिंग क्षेत्रात आल्यानंतर तिला तिचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us