Todays Gold Rate: काय सांगता सोन्याच्या भावात पुन्हा मोठी वाढ! आजच्या 10 ग्रॅमच्या भावाने हद्दच पार केली

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर सतत वाढत असल्याचे दिसत आहे. हे भाव सध्या आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहून सर्वसामान्यांना धक्काच बसेल.

| Updated on: Feb 07, 2026 | 2:08 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले सोने आणि चांदीचे भाव आकाशाला स्पर्श करत आहेत. आजचा तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव ऐकून तुम्ही देखील चकीत व्हाल. अनेक सर्वसामान्य लोकांचे आता सोने खरेदीचे स्वप्न अपुरे राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले सोने आणि चांदीचे भाव आकाशाला स्पर्श करत आहेत. आजचा तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव ऐकून तुम्ही देखील चकीत व्हाल. अनेक सर्वसामान्य लोकांचे आता सोने खरेदीचे स्वप्न अपुरे राहणार आहे.

2 / 5

2025च्या शेवटी सोन्याच्या भावांमध्ये सतत वाढ होताना दिसत होती. आता हेच भाव थांबायचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसमान्य माणसे सोने घेताना दहा वेळा विचार करत आहेत. कारण सोन्याचे भाव हे त्यांच्या खिश्याला न परवडणारे झाले आहेत.

3 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 300 रुपये तर चांदीच्या दरात 5 हजारांची वाढ झाली आहे.

4 / 5

आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 135 रुपयांवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 67 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत. सतत वाढत असलेले भाव पाहून येत्या काळात सोने प्रचंड महागणार असल्याचे चित्र आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us