Todays Gold Rate: लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सराफ बाजारात खळबळ! सोन्याचे दर वाढले, 10 ग्रॅमचा भाव…
Todays Gold Rate: ऐन दिवाळीत सोने आण चांदीचे दर वाढले असल्याचे समोर आले आहे. आज सोने आणि चांदीचा भाव किती आहे? चला जाणून घेऊया...

दिवाळी हा सण म्हटलं की अनेकजण सोने खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकजण सोने खरेदी करतात. पण यंदा सोने आणि चांदीचे दर पाहाता अनेकांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. आज सोन्याचा भाव किती ते वाचा...
काल दिवसभर सोन्या आणि चांदीचे दर स्थिर होते. त्यामुळे नागरिकांना दिलासा होता. मात्र, आज जळगावच्या सराफ बाजारात पुन्हा सोन्या आणि चांदीचा दरात मोठी वाढ झाली आहे.
आज सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 47 हजार 805 रुपयांवर पोहोचला आहे.
तसेच दुसरीकडे चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ झाली आहे. त्यानंतर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 96 हजार 730 रुपये झाले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)