
आपले अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अंतराळात हजारो-लाखो उल्कापिंड आहेत. ते सगळेच अंतराळात फिरत असतात. दरम्यान, वैद्यानिकांनी समस्त पृथ्वीला चिंतेत टाकणारा एक शोध लावला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

ब्राझीलमधील साओ पाऊलो स्टेट युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्रांनी नुकतेच काही उल्कापिंडांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. शुक्र ग्रहाच्या आसपास 20 असे उल्कापिंड आहेत, जे पृथ्वीला संकटात टाकू शकतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

हे 20 उल्कापिंड पृथ्वीवर आदळले तर मोठा विनाश होऊ शकतो. या उल्कापिंडांना सिटी किलर असेही म्हटले जात आहे. हे 20 उल्कापिंड अन्य उल्कापिंडाप्रमाणे स्थिर राहून शुक्र ग्रहाच्या भोवती फिरत नाहीत. ते सतत आपली दिशा बदलतात. याच कारणामुळे हे उल्कापिंड पृथ्वीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

यातील काही उल्कापिंडांचा आकार 140 मीटरपेक्षा अधिक आहे. मंगळ आणि गुरू ग्रहांच्या भोवती असणाऱ्या उल्पापिंडामधून हे उल्कापिंड शुक्र ग्रहाकडे आले असावेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

शुक्र ग्रह तसा पृथ्वीपासून दूर आहे. पृथ्वी आणि शुक्र यांचे अंतर साधारण 4 कोटी किलोमीटर आहे. मात्र या 20 उल्कापिंडांची फिरण्याची दिशा ही निश्चित नसल्यामुळे हे उल्कापिंड जर पृथ्वीच्या दिशेने आले तर चिंताजनक स्थिती होऊ शकते, असे शास्त्रज्ञांना वाटते. त्यामुळे आगामी काळात याबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)