टीव्ही इंडस्ट्रीतील श्वेता तिवारीची स्पर्धक, दोघी वयाच्या पंचेचाळीशीत पण सौंदर्य, मादक अदांमध्ये तोडीस तोड
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. पण वयाच्या पंचेचाळीशीत अजून एक अभिनेत्री आहे, जी श्वेता तिवारीला टक्कर देते. जाणून घ्या तिच्याबद्दल.

टीव्ही इंडस्ट्रीत फिटनेस आणि सौंदर्याचा विषय असेल, तर श्वेता तिवारीचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. पण अजून एक अभिनेत्री आहे, जी वयाच्या पंचेचाळीशीत आपला फिटनेस , ग्लोइंग स्किन आणि स्टायलिश लूकने श्वेता तिवारीला कडवी टक्कर देत आहे.

वयाच्या या टप्प्यावर अनेकदा लोक आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करतात. पण श्वेताची स्पर्धक असलेल्या या अभिनेत्रीने या वयातही स्वत:ला असं मेंटेन केलं आहे की, तिला पाहिल्यानंतर तिच्या खऱ्या वयाच्या अंदाजच लागत नाही.

अनीता हसनंदानी फक्त एक चांगली अभिनेत्रीच नाही, तर ती तिच्या फिटनेसमुळे सुद्धा चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या फिट आणि Active लाइफस्टाइलची झलक स्पष्टपणे पहायला मिळते. खास बाब म्हणजे फिट राहण्यासाठी ती अवघड रुटीन फॉलो करत नाही.

काही सोप्या पण नियमित सवयी स्वीकारुन ती स्वत:ला हेल्दी आणि एनर्जेटिक ठेवते. अनिताचं फिटनेस रुटीन जाणून घेऊया. भारी एक्सरसाइज करताना ती फक्त स्टॅटिक स्ट्रेचिंग करत नाही. डायनामिक मूवमेंटस सुद्धा करते. ग्राऊंडवर सिट-आऊटस आणि लेटरल ट्रांजिशन.

यामुळे शरीराची लवचिकता आणि हालचाल दोन्ही सुधारते. तिच्या वर्कआऊटमध्ये स्लांट बोर्डसह केटलबेल स्क्वॅट्स सुद्धा आहेत. यात टाचा थोड्या वर उचलल्या जातात. यामुळे लोअर बॉडीच्या मसल्स जास्त एक्टिव होतात.