AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: सवलतीच्या नादी लावून… कुणबी आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला खणखणीत इशारा… म्हणाले सर्वांवर पाणी फिरेल…

Manoj Jarange Patil on Kunbi Validity Certificate: मराठा आरक्षणाच्या अनेक प्रलंबित मागण्या राज्य सरकार खटाखट मंजूर करत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. त्यांनी सरकारचे आभार मानले असले तरी गृहीत न धरण्याचे वक्तव्य केले आहे. काय म्हणाले जरांगे पाटील?

Manoj Jarange: सवलतीच्या नादी लावून... कुणबी आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला खणखणीत इशारा... म्हणाले सर्वांवर पाणी फिरेल...
मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 1:25 PM
Share

राम दखणे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला चांगले यश आले आहे. सरकारने तातडीने काही मागण्याची पूर्तता केली आहे. तर ओबीसींच्या धरतीवर मराठा समाजाला सवलतींना मान्यता दिली आहे. जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानतानाच एक खणखणीत इशाराही दिला आहे. सवलतीच्या नादी लावून मराठा आरक्षणाचे उद्दिष्ट अधांतरी न ठेवण्याचा सज्जड दम (Manoj Jarange Patil on Kunbi Validity Certificate) त्यांनी दिला आहे. काय म्हणाले जरांगे पाटील?

मूळ आरक्षणाचा विषय बाजूला नको

सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्वजण मराठा समाजाची नाराजी अंगावर घेणार नाही असं मला वाटतं. काल त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती लागू केल्या त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे मनापासून कौतुक करतो. तुमच्या माध्यमातून माझं एक म्हणणं आहे की,याच्या सवलती ओबीसी प्रमाणे दिलेले आहेत, या फार गरजेच्या होत्या. समाजाला मी ज्यावेळेस पूर्ण काही मिळतं त्यावेळी मी समाधानी असतो, काही प्रमाणात त्यांनी निर्णय घेतले त्याचे श्रेय सुद्धा आम्ही त्यांना दिलं. परंतु माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की राहिलेल्या ज्या मागण्या, आहे त्याला सुद्धा अंमलबजावणी मिळणे गरजेचे आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. जे निर्णय घेतलेले आहे त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. विशेष करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे सुद्धा आभार मानतो. पण तुम्हाला असं वाटत असेल की हे दिल्यामुळे मराठा समाजाचा विसरून जाईल हे तुमचं अर्धवट स्वप्न राहील.नसता इकडे केलेल्या सगळ्यावर पाणी फिरून जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. तुम्ही सवलतीच्या नादी लावून आमचं मूळ आरक्षणाचं बाजूला राहायच हे चालणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

व्हॅलिडीटी रोखण्याचा आरोप

ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या व्हॅलिडीटी रोखण्याचा काम सुरू आहे, त्याकडे बारीक लक्ष सरकारने दिले पाहिजे. 58 लाख नोंदी निघाल्या त्याच्या कोणती प्रमाणपत्र दिले परंतु त्याची व्हॅलिडीटी रोखण्याचं काम झालं. ओबीसी प्रमाणे आम्हाला सवलती दिल्या, आम्ही खुश राहू. परंतु कुणबी मधून ज्या ज्या मुलांनी ॲडमिशन घेतले. नोकरीला लागले यांच्या व्हॅलिडीटीवर सुद्धा सरकारने लक्ष ठेवावं. हैदराबाद गॅझेट प्रमाणे प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

58 लाख कुणबी नोंदी निघाल्या त्याची प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. नसता इकडे सगळं केल्यावर पाणी फिरल असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा दिला. कारण तुम्ही सवलतीच्या नादी लावून आमचं मूळ आरक्षणाचं बाजूला राहायचा हे चालणार नाही. सातारा संस्थान आणि औंध संस्थांचा जीआर निघणं गरजे आहे . सरकारचं मी मनापासून आभार मानतो मात्र आमचे पुढचे काम थांबवू नका, तुम्हाला असं वाटत असेल की हे दिल्यामुळे मराठा समाजाचा विसरून जाईल हे तुमचं अर्धवट स्वप्न राहील. हे सगळे काम झाल्यावर मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसी नेत्यांवर तोंडसुख

कोण काय बोलत त्याला काय महत्त्व द्यायची गरज नाही याची दखल घ्यायची नाही, जे मराठ्यांचे शत्रू आहेत जे मराठ्यांच्या विरोधात काम करतात त्याची दखल घ्यायची नाही. हे ओबीसी चे नेते नाहीत ओबीसीचा नेता वेगळा असतो, तो समान सगळ्यांच्या लेकरासाठी लढणारा असतो तो नेता असतो. हे ओबीसी नेते नाही तर लाभार्थी टोळीचे छोट्या छोट्या जातीचे नेते आहेत असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी बबनराव पायवाडे यांच्यासह लक्ष्मण हाके यांच्यावर केला. ओबीसींचा नेता या राज्यामध्ये होऊ शकत नाही, जातीच्या आड लपवायचं आणि ओबीसी च नाव घ्यायचं, यांनी ओबीसी साठी काय केलं, मायक्रो ओबीसींचा किती धिंगाणा झाला ओबीसींच्या जातीचं काय वाटोळ झालं, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

हे बळजबरीने स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेत असल्याचा खोचक टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. सरकारला सुद्धा माहीत झालेला आहे की यांचे उडी कुठ पर्यंत आहे, लाभासाठी थांबलेले आहे, लाभाची वाट पाहत आहे. मी त्याला मोजत नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांना टोला लगावला. आम्हाला मिळायला लागलं की जळणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तुमच्यामध्ये जी खोड आहे की सरकारने ओळखलेली आहे, लाभापोटी थांबलेले लोक कोण कोण? हे फक्त लाभ घेण्यासाठी थांबलेले आहे असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांवर केला.

Follow Us
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?