AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना सुरू आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. कारण हा त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक
IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंदImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 19, 2026 | 10:49 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्माची खेळी काही खास नव्हती. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवट लॉर्ड्स मैदानावर होणार, अशा वावड्या उठल्या होत्या. दुसऱ्या वनडे सामन्यात त्याची खेळी अवघ्या 26 धावांवर आटोपल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. पण बीसीसीआयने या अफवांचं खंडन केलं आणि धुराळा शांत झाला. असं असताना सर्वांचं लक्ष हे लॉर्ड्स मैदानात रोहित शर्माच्या खेळीकडे लागून होतं. या सामन्यात रोहित शर्माची कामगिरी कशी होते? याबाबत चर्चा सुरू होत्या. कारण या सामन्यात फेल गेला असता तर पुढच्या वनडे मालिकेत स्थान मिळणं कठीण झालं असतं. तसेच वनडे मालिकेतून वगळलं तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं स्वप्नही भंगणार होतं. पण रोहित शर्माने शेवटच्या वनडे सामन्यात टीकाकारांची तोंड बंद केली.

इंग्लंड तिसऱ्या वनडे सामन्यात विजयासाठी 388 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं. त्यामुळे चांगली सुरूवात करून देण्याचं काम सलामीच्या जोडीवर होतं. तशीच खेळी कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी केली. रोहित शर्माने 50 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. सलग दोन चौकार मारले आणि अर्धशतक साजरं केलं. या अर्धशतकी खेळीत रोहित शर्माने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतरही त्याची खेळी सुरू होती. त्याने शुबमन गिलसोबत 147 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल 77 धावा करून बाद झाला. त्यानंतरही रोहित शर्माचा झंझावात सुरू होता. झपाटल्यासारखा धावांचा पाऊस पाडत होता.

रोहित शर्माने 84 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकार मारत शतक साजरं केलं. त्याने 120.24 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे त्याला संघातून वगळण्याच्या बातम्यांना आता ब्रेक लागणार आहे. कारण त्याने अगदी मोक्याच्या सामन्यात शतक ठोकलं आहे. त्यामुळे रोहित शर्माची क्रिकेट कारकिर्द अजून थांबली असा संदेश त्याने टीकाकारांना दिला आहे. तसेच अजूनही बरंच क्रिकेट उरल्याचं दाखवून दिलं आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप