त्या अपघातानंतर जुळलं सूत! कुठे भेटले प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराजे? वाचा फिल्मी लव्हस्टोरी

Prajakta Gaikwad Love Story : नुकताच अभिनेत्री प्राजक्ता गायवाडचा साखरपुडा झाला. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिची लव्हस्टोरी सांगितली आहे. दोघांची पहिली भेट कुठे झाली? त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय कसा घेतला? चला जाणून घेऊया...

| Updated on: Aug 09, 2025 | 1:39 PM
1 / 5
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत येसुबाईंच्या भूमिका साकारात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. प्राजक्ताने नुकताच साखरपुडा केला आहे. पण प्राजक्ताचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? असा प्रश्न सर्वांना पडतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिची फिल्मी लव्हस्टोरी सांगितली आहे. चला जाणून घेऊया...

2 / 5
प्राजक्ता गायकवाडने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शंभुराजच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. महाराणी येसूबाई या भूमीकेमुळे प्राजक्ताला वयाच्या १८व्या वर्षापासूनच स्थळे यायला लागली होती. पण तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते.

3 / 5
एकदा प्राजक्ता शूटिंगसाठी सेटवर जायला निघाली होती. तिची नाईट शिफ्ट होती. सोबत प्राजक्ता नव्या घराची खरेदीही करायची होती. अचानक एक ट्रक आला आणि तिच्या गाडीला थोडा धडकला. प्राजक्ता प्रचंड चिडली होती. तिने त्या ट्रक चालकाला मालकाला बोलाव असे म्हटले. तेवढ्यात शंभूराज तेथे आले. त्यांनी कोणताही विचार न करता ट्रक चावलाच्या कानशिलात लगावली.

4 / 5
या अपघातामध्ये प्राजक्ताच्या गाडीचे नुकसान झाले होते. तिला नाईट शिफ्टला जायचे होते. हे सगळं लक्षात घेता शंभुराज तिला सोडायला गेला. त्याने प्राजक्ताला सेटवर सोडलं. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. सुरुवातीपासूनच शंभुराजला प्राजक्ता आवडत होती. तो तिला मॅडम म्हणून आवाज देत होता.

5 / 5
प्राजक्ताने काही दिवसांनंतर घरी बोलण्याचा निर्णय घेतला. कारण प्राजक्ताला कुटुंबीयांच्या संमतीन लग्न करायचे होते. त्यानंतर शंभूराज घरी गेला. त्याने बोलणी केली. दोघांच्याही घरातले तयार झाले.