
टायर पंक्चर झाल्यानंतर सर्वात आधी रस्त्याच्या कडेला एक सुरक्षित जागा शोधा, जिथे तुम्ही आरामात काम करु शकाल. हळू-हळू टायर फिरवा किंवा हवी लीकचा आवाज ऐकून पंक्चर चेक करा. तुम्ही साबणाचा पाणी सुद्धा वापरु शकता. अनेकदा टायर खीळा घुसल्याने पंक्चर होतो. (Getty Images)

ट्यूबलेस टायरसाठी ही पद्धत आहे, हे लक्षात घ्या. पाणी आणि साबणाने पंक्चर वाला भाग साफ करा. पंक्चर दुरुस्त करण्यासाठी पंक्चर रिपेयर किट आणि एयर इन्फ्लेटर या दोन गोष्टी तुमच्याकडे हव्यात. तुम्हाला टायरमध्ये खिळा सापडल्यास त्याला प्लायरने बाहेर काढा. (Getty Images)

रीमरने पंक्चरच्या छिद्राला रीम करा. त्यामुळे प्लग चांगल्या पद्धतीने चिकटेल. आता रबर सिमेंटला छिद्र आणि प्लग दोन्ही ठिकाणी लावा. प्लग म्हणजे पंक्चर रिपेयर स्ट्रिप छिद्रात टाका. जोरात दाबा. (Getty Images)

एक्स्ट्रा स्ट्रिपला कापून टाका. त्याला सुकण्यासाठी काही मिनिट द्या. ते चांगल्या पद्धतीने बसल्यानंतर टायर एयर इन्फ्लेटरचा वापर करा. त्यानंतर मॅन्युफॅक्चररने हवेचा जो दाब ठरवलाय, टायरमध्ये तितकी हवा भरा. (Getty Images)

टायर प्रेसर गेज असेल, तर त्याने प्रेशर लेवल चेक करता येईल. अशा पद्धतीने तुम्हीच पंक्चर ठीक करु शकता. तुम्ही लोकल शॉप किंवा अमेजन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरुन टायर पंक्चर रिपेयर किट आणि टायर एयर इन्फ्लेटर खरेदी करु शकता. (Amazon)