
मुंबईचा खेळाडू अमोल मजुमदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. तरीसुद्धा या खेळाडूला संधी मिळाली नाही. अमोल मजुमदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई आसाम आणि आंध्र प्रदेशकडून प्रतिनिधित्व केलं. सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी अमोल मजुमदारलाही क्रिकेटचे धडे दिले होते. मात्र या खेळाडूल नशिबाची साथ मिळाली नाही.

जलज सक्सेना हे देशांतर्गत क्रिकेटमधील मोठं नाव आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून तो खेळला. यासोबतच तो इंडिया रेड, सेंट्रल जॉन मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचा भाग होता. परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करूनही जलज सक्सेनाला टीम इंडियाची जर्सी घालण्याची संधी मिळाली नाही.

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम प्रदर्शन केलं आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, पुणे वॉरियर्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. मात्र त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. मिथुन मन्हासने आयपीएलमध्ये 55 सामने खेळले आहेत.

अमरजीत कायपी 80 आणि 90 च्या दशकात स्टार फलंदाज म्हणून ओळखला जात होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 52.27 च्या सरासरीने 7894 धावा केल्या. यामध्ये त्याने 27 शतके ठोकली होतीत मात्र तरीसुद्धा त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

राजिंदर गोयल यांनी 1958/59 च्या मोसमात रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. रणजी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स त्यांनी घेतल्या आहेत. राजिंदर गोयल 1885 पर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिले यामध्ये त्यांनी 639 विकेट घेतल्या. हरियाणाकडून ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळले. 21 जून 2020 साली वयाच्या 77 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.