Usha Nadkarni: माझ्या अंत्यसंस्काराला इंडस्ट्रीतील लोकांनी येऊ नये कारण…उषा नाडकर्णी यांचं वक्तव्य चर्चेत
Usha Nadkarni Last Wish: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीने त्यांनी इच्छा बोलून दाखवली आहे. जेव्हा त्यांचा मृत्यू होईल तेव्हा त्यांना त्यांच्या मैताला कोण नको आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा ना़डकर्णी वयाच्या 80 व्या वर्षी ही त्याच जोराने काम करताना पाहायला मिळतात. त्यांनी नवीन मालिका 'येतेच मी नांदायला' ही 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत त्या ठकुबाईच्या भूमिकेत दिसणार आहे.
उषा नाडकर्णी यांना पुन्हा टेलिव्हिजनवर पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. आता या नव्या मालिकेदरम्यान त्यांनी मुलाखत दिली आहे. उषा नाडकर्णी म्हणाल्या, "इंडस्ट्रीत मला मानणारे खूप लोक आहेत, मात्र मी मरताना इंस्ट्रीतील कोणीच येऊ नये अशी माझी इच्छा आहे."
मीडिया टॉकशी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या," माझ्याबद्दल वाटेल तसे बोलतात, मला सगळं माहिती आहे सगळ्यातलं, मला हेही माहित आहे की मला न मागता अनेक काम मिळाले आहेत, माझी कामं चांगली होतात असं लोकांकडून कळते,"
"मागील वर्षी मी तीन चित्रपट केले, गांधी टॉक्ल, तुंबाडची मंजुळा, आणि महाराष्ट्र फाईल्स, यामुळे मला काहीही न करता काम मिळाली, माझ्या एक्सट्री करिक्युलकर अॅक्टिव्हिटी पण नसतात की ज्यामुळे मला कामं मिळतील." उषा नाडकर्णी म्हणाल्या.
मी नोकरी करुन माझं काम करत होते जेणेकरुन मला कोणाला शुभ सकाळ बोलायची गरज नव्हती, किंवा कोणाला सलामही करायला लागला नाही, मी नेहमी बोलते माझं काम बोलतं, माझ्याबद्दल जे लोक बोलतात त्या बिचाऱ्यांकडे काम नाहीत, ते घरी बसलेले आहेत."