AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Life : ब्रेकअपनंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची ‘ती’ कमेंट चर्चेत; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत पुन्हा जोडलं जातंय नाव ?

Love Life : सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या खासगी आयुष्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत त्याचं पुन्हा जोडलं जातंय नाव ?

Love Life : ब्रेकअपनंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची 'ती' कमेंट चर्चेत; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत पुन्हा जोडलं जातंय नाव ?
| Updated on: Nov 28, 2026 | 3:24 PM
Share

राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि अभिनेता वीर पहारिया हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने अभिनेत्री तारा सुतारियासोबतचं रिलेशनशिप जगजाहीर केलं होतं. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही.. अशी देखील चर्चा रंगली. एका कॉन्सर्ट दरम्यान, तारा आणि एपी ढिल्लन यांना एकत्र पाहिल्यानंतर, तारा आणि वीर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरलेला. दोघांनी अद्यापही ब्रेकअप झाल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण एका पोस्टवर वीर याची कमेंट पाहिल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

सांगायचं झालं तर, अभिनेत्री तारा आणि वीर यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या ब्रेकअपच्या अफवा सुरू असतानाच वीरने ताराच्या सोशल मीडिया पोस्टवर केलेल्या एका कमेंटमुळे त्यांच्या नात्यात पुन्हा सर्व काही सुरळीत झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडिया स्टार ओरीने तारासोबत तिच्या घरी झालेल्या खासगी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला होता. या पोस्टवर वीरने केक आणि पांढऱ्या हार्टचा इमोजी कमेंट केला. वीरच्या या छोट्याशा कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून दोघांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वीरच्या कमेंटनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत दोघांनी पुन्हा एकत्र यावे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी तर त्यांच्या नात्याला दुसरी संधी मिळणार का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त वीर – तारा यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरलेला.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry)

‘कॉफी विथ करण’मध्ये जाह्नवीने दिलेला सल्ला

दरम्यान, याच वर्षाच्या सुरुवातीला जाह्नवी कपूर वरुण धवनसोबत ‘कॉफी विथ करण’च्या नवव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील रॅपिड फायर राउंडमध्ये करण जोहर याने जाह्नवीला वीरला डेटिंगबाबत कोणता सल्ला देशील, असा प्रश्न विचारला होता. त्यावर जाह्नवीने, ‘त्याला कधीही कोणत्याही कॉन्सर्टला घेऊन जाऊ नकोस,’ असं मजेशीर उत्तर दिलं होतं.

जाह्नवी वीरचा भाऊ शिखर पहाडियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. जाह्नवीच्या या उत्तराची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. काही चाहत्यांनी तिच्या वक्तव्याचा संबंध एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टशी जोडला होता. जाह्नवी देखील तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. जाह्नवी आणि शिखर यांना लग्न कधी करणार? हा प्रश्न देखील चाहते सतत विचारत असतात.

Follow Us
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?