
अनेकजण बाथरुममध्ये महागडे आरसे लावातात. काही लोकांच्या आरशांची किंमत तर कित्येक हजार रुपये असते. परंतु आरशाच्या बाबतीत वास्तूशास्त्राचा नियम पाळला नाही तर आपला मोठा तोटा होऊ शकतो. अनेकजण वास्तूशास्त्राचे नियम पाळत नाहीत. परिणामी त्यांच्या घरात अशांती नांदते. सोबतच आर्थिक नुकसानही होते. त्यामुळे वास्तूशास्त्रात बाथरुममध्ये आरसा लावण्यासंंबंधीचे नियम काय आहेत, ते जाणून घेऊ या.... (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

तुम्हाला बाथरुममध्ये आरसा लावायचा असेल तर तो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. हा आरसा तुम्ही भिंतीवर लावायला हवा. तुम्ही बाथरुममध्ये गोलाकार आकाराचा आरसा लावू शकतो. गोलाकार आरशामुळे सकारात्मकता निर्माण होते. बाथरुममध्ये आरसा लावताना तो थेट दरवाजाच्या समोर येणार नाही, याची काळजी घ्यावी. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

आपण जेव्हा बाथरुममध्ये जातो, तेव्हा आपल्यासोबत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही उर्जा प्रवेश करतात. त्यामुळेच बाथरुममधील आरशाला नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेलाच लावावे. तुम्ही बाथरुममध्ये आयाताकृती आरसादेखील लावू शकता. तुमचे बाथरुम दक्षिण पश्चिम दिशेला असेल तर आरसा पूर्व दिशेला असावा. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

तुम्ही बाथरुममध्ये आरसा लावलेला असेल तर तो तुटलेला नसावा. आरसा तुटलेला असेल तर तो लगेच बदला. तुटलेल्या आरशामुळे नकारात्मकता वाढते. तसेच नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. बाथरुममधील आरसात टॉयलेट सीट दिसणे अशुभ मानले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)