
विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विकी कौशल याचा चित्रपट सरदार उधम याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने तब्बल वेगवेगळे चार पुरस्कार पटकावले.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यादीमध्ये सरदार उधम चित्रपटाचा जलवा बघायला मिळाला. मात्र, बेस्ट अभिनेता सरदार उधम या चित्रपटासाठी विकी काैशल याला मिळाला नाही.

अल्लू अर्जुन याला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आता यावर विकी काैशल हा पहिल्यांदाच बोलताना दिसलाय. विक्की कौशल म्हणाला, माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळाले.

पुढे विकी काैशल म्हणाला की, बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नसल्याने मी निराश नाहीये. माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळाले आहेत.

सरदार उधम या चित्रपटामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली हिच माझ्यासाठी मोठी गोष्ट नक्कीच आहे. यावेळी विकी काैशल याने कतरिना कैफबद्दलही मोठा खुसासा केला.