Vidyanand Bapat: शेण खाऊन गोमुत्राच्या नशेत बेधुंद होताय, याचा माज कसला? विद्यानंद बापट गणेशभक्तांवर संतापले
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांनी गणेशोत्साव पुण्यात झालेल्या ध्वनीप्रदुषणावरुन आता गणेश मंडळावर संताप व्यक्त केला आहे.

- पुण्यात विसर्जन मिरवणुकीत प्रचंड ध्वनीप्रदूषण झाले, मोठ-मोठ्या आवाजत डिजे वाजवला गेला. विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सावाच्या आधीच या सर्व गोष्टींना विरोध केला होता, आता त्याच गोष्टी घडल्याने विद्यानंद बापट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
- विद्यानंद बापट म्हणाले, “या मूर्खपणासाठी लाऊड स्पीकर बाय डेफिनेशन लाऊड आवाज करत आहे, हे खुल्या आवाजात वाजवण्याची गोष्ट नाही बंदिस्त आवाजात वाजवण्याची गोष्ट आहे. यासाठाी मूर्खासारख्या परवाणग्या वाटतानाच विचार करायला पाहिजे. खुळचट पणाला परवानगी वाटणं हे भयंकर खुळचटपणा आहे.”
- “यांचा मेंदू गुडघ्यात काय घोट्यात पण नाही. यांच्याबाबत बडबडत बसण्यात काही अर्थ नाही, उत्सव मुळात बावळट असतो… देव भोळा असतो तो विष्टा खातो. शेण खाऊन माजलेला आणि गोमुत्राच्या धुंदेत असलेला देव भोळा धर्म भोळा बावळट उत्सवखोर त्याच्याकडून रॅशनल कृतीची अपेक्षा करू शकत नाही.” असं बापट म्हणाले.
- “उत्सवखोर म्हणजे झोंबी आहे. याच्याशी तुम्ही तार्किक युक्तिवाद करू शकत नाहीत. बाकी काय शेण खा, कितीही गोमूत्र प्या, ते खाऊ शकतात. तर त्यामुळे… त्यांच्याकडून त्यापलीकडे काही अपेक्षाच नाही, की ते देवभोळे, धर्मभोळे, शेण खाणारे आणि गोमूत्र पिणारे. तर त्यांची परवानगीची मिजास मात्र आम्ही नक्की उतरवू, असंही पुढे बापटांनी म्हटलं आहे.
- पुण्यातील प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा केवळ ढोल-ताशांचा गजर आणि डीजेचा आवाजही घुमताना पाहायला मिळाला. यामुळे आता बापट पुन्हा तापले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us