जे सीन दाखवायला आजही घाबरतात, ते 50 वर्षांपूर्वीच मराठमोळ्या माणसाने नाटकात दाखवलं, आजूनही होते प्रचंड चर्चा
जेव्हा सिनेसृष्टी गंभीर विषयांवरील चित्रीकरण करत नव्हती किंवा करण्यासाठी शंभर वेळा विचार करायचा, अशा वेळी एका मराठमोळ्या लेखकाने सर्व रूढी मोडून काढत मानवी मनातील सौंदर्य, वासना, क्रौर्य, जसेच्या तसे प्रेक्षकांसमोर मांडले.

विजय तेंडुलकर यांचा जन्म 6 जानेवारी 1928 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचा जन्म सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील कारकून होते आणि घरात प्रकाशनाचा व्यवसायही होता.
त्या काळात मुलांना खेळण्याशिवाय फारसे काही सुचत नसे. अशा वयात म्हणजे 21 व्या वर्षी तेंडुलकरांनी लेखनाला सुरुवात केली. पुढे त्यांनी गंभीर विषय आपल्या लेखनातून मांडले.
त्या काळात बॉलिवूडही गंभीर विषयांवर चित्रपट करताना विचार करत असे. मात्र, तेंडुलकरांनी रूढी मोडून मानवी मनातील सौंदर्य, वासना आणि क्रौर्य प्रेक्षकांसमोर आणले. त्यांच्या लेखनातून मानवी स्वभावाचे पैलू उलगडले.
1955 मधील ‘श्रीमंत’ या नाटकात अविवाहित आईची कहाणी होती. समलैंगिक संबंधांवरील ‘मित्राची गोष्ट’ या नाटकातून त्यांनी मानवी मनाची चंचलता मांडली. त्या काळात असे विषय रंगमंचावर आणणे धाडसाचे होते
‘शांतता! कोर्ट चालू आहे’, ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाईंडर’ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. या नाटकांनी मराठी रंगभूमीवर छाप पाडली. त्यांच्या विषयांमुळे चर्चा आणि वाद निर्माण झाले.