Vinod Kambli: विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती कशी? जीवलग मित्राकडून मोठा खुलासा
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता, यामध्ये त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याची पाहायला मिळाली, यानंतर त्यांच्या मित्राने त्यांनी भेट घेतली असून त्यांची हेल्थ अपडेट दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाचा माजी खेळाडू विनोद कांबळी याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यात तो एका वृद्धाश्रमात असल्याची माहिती त्यांनीच दिली. त्यांची अवस्था पाहून चाहत्यांनी धडकीच भरली.
अशातच आता विनोद कांबळी यांच्या प्रकृतीसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. विनोद कांबळी यांच्या मित्राने आता त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. विनोद कांबळीचा बालपणीचा मित्र आणि भारताचे माजी अंपायर मार्कस कुटो यांनी विनोद कांबळी यांची भेट घेतली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विनोद कांबळीची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. त्यांनी सकाळी स्वतः व्यवस्थित नाश्ता केला, आधीपेक्षा ते आता अधिक सक्षम दिसत आहेत. त्यांची स्मरणशक्तीही पूर्वीसारखीच चांगली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे विशेष काही कारण नाही. अशी माहिती कुटो यांनी दिली आहे.
दोन दिवसााधी विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती, ते ठाण्यातील एक वृद्धाश्रमात बॅडवर बसलेले पाहायला मिळाले.
यावेळी त्यांनी त्या वृद्धाश्रमाचे भरपूर कौतुक केले, तिथे त्यांना घरासारखे वाटत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. तसेच तिथे त्यांच्यावर चांगले उपचार होत असून त्यांची प्रकृती आता सुधारत आहे असे ते त्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते.