विशाल निकमने ‘या’ पवित्र ठिकाणी बांधली लग्नगाठ; जिथे लग्न करण्याचं अनेकांचं असतं स्वप्न

| Updated on: Feb 12, 2026 | 10:57 AM
1 / 7
'बिग बॉस मराठी 3'चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विशाल निकमने नुकतीच अभिनेत्री अक्षया हिंदळकरशी लग्नगाठ बांधली आहे. विशाल आणि अक्षया यांनी त्यांच्या लग्नासाठी अत्यंत खास आणि पवित्र जागा निवडली आहे.

'बिग बॉस मराठी 3'चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विशाल निकमने नुकतीच अभिनेत्री अक्षया हिंदळकरशी लग्नगाठ बांधली आहे. विशाल आणि अक्षया यांनी त्यांच्या लग्नासाठी अत्यंत खास आणि पवित्र जागा निवडली आहे.

2 / 7

याठिकाणी लग्न करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. विशाल आणि अक्षयाचंही हे स्वप्न पूर्ण झालं आहे. उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात हिंदु विवाहपद्धतीनुसार दोघं विवाहबंधनात अडकले.

3 / 7

याआधी उत्तराखंडमधील हरिद्वार इथल्या गंगाघाटवर या दोघांनी साखरपुडा केला. गंगाघाटवर साखरपुडा करण्याचं स्वप्न पूर्ण झालं विशू, असं कॅप्शन लिहित अक्षयाने साखरपुड्याचे खास फोटो पोस्ट केले होते.

4 / 7

त्यानंतर आता त्रियुगीनारायण मंदिरातील विवाहसोहळ्याचा व्हिडीओ दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

5 / 7

'चंद्र भागेसारखं प्रेम आपलं सखी, मी तुझ्यात सामावून जाईन, रुसली जरी तू रखुमाईसारखी, मी सावळा विठ्ठल होऊन जाईन, कायम तुझा रुसवा काढून, तुला आयुष्यभर मनवत राहीन,' अशा शब्दांत विशालने प्रेम व्यक्त केलं आहे.

6 / 7

उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात त्रियुगीनारायण हे मंदिर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचं पवित्र स्थान म्हणून ओळखलं जातं. त्रेतायुगात भगवान विष्णू यांनी याठिकाणी शिव-पार्वतीचं लग्न लावून दिलं होतं, असं म्हटलं जातं.

7 / 7

या मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथे अखंड धुनी म्हणजेच अग्निकुंड गेल्या तीन युगांपासून तेवत आहे. तीन युगांपासून इथे विष्णूंची पूजा होत आहे. म्हणूनच याला त्रियुगीनारायण मंदिर म्हणतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us