बदाम, काजू ते अक्रोड; भारतातील कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या सुकामेव्याचे उत्पादन घेतले जाते?
भारतात अशी अनेक राज्ये आहेत जिथे अक्रोड, बदाम, पिस्ते आणि काजू यांसारख्या विविध सुकामेव्यांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, देशात सुकामेव्याचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते?

जम्मू आणि कश्मीर हा अक्रोड पिकवणारा सर्वात प्रमुख प्रदेश आहे. इथे देशात सर्वाधिक अक्रोडाचे उत्पादन होते. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, लडाख आणि मथिपूर येथेही अक्रोडाचे उत्पादन होते.
बदाम उत्पादनात जम्मू आणि काश्मीरदेखील आघाडीवर आहे. जम्मू आणि काश्मीर व्यतिरिक्त, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातही बदामाची लागवड केली जाते. काश्मीरमधील बडगाम, श्रीनगर, पुलवामा, अनंतनाग, गांदरबल आणि बारामुल्ला यांसारख्या भागांमध्ये बदामाची लागवड केली जाते.
काजू हा भारतातील प्रत्येक घरामध्ये आढळतो. जवळपास प्रत्येक सुकामेवाप्रेमी काजू खातोच. त्यांची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि गोवा यांसारख्या अनेक राज्यांमध्ये केली जाते.
भारतात पिस्ताचं उत्पादन खूपच मर्यादित होतं. जम्मू आणि काश्मीरमध्ये पिस्त्याची लागवड केली जाते, परंतु देशात विकले जाणारे बहुतेक पिस्ते हे आयात केलेले असतात.
चिलगोजा हा देखील एक प्रमुख सुकामेवा मानला जातो. याचे उत्पादन प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातील किन्नौरसारख्या हिमालयीन प्रदेशात होते. हे जास्त उंचीच्या, थंड आणि कोरड्या भागांमध्ये आढळते.