
Choron Ki Bawdi : भारतात तसेच जगभरात अशी काही ठिकाणं सापडलेली आहेत जिथे इतिहासकार, संशोधक तसेच सामान्य लोकांना अचानकपणे खजाना सापडलेला आहे. काही ठिकाणी अजूनही जुन्या लोकांनी खजाना लपवून ठेवलेला आहे, असा दावा केला जातो. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

हरियाणा राज्यातील रोहतक येथील विहिरीमध्येही अशाच प्रकारचा खजाना असल्याचा दावा केला जातो. या विहिरीला चोरो की बावडी असे म्हटले जाते. या ठिकाणाला स्वर्गातला झरा असेही म्हटेल जाते. त्यामुळेच हे ठिकाण पाहण्यासाठी लोक दुरून येतात. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

या विहिरीत अब्जो रुपयांचा खजाना आहे, असा दावा केला जातो. सोबतच या विहिरीत अनेक भुयारी मार्ग असल्याचेही सांगितले जाते. हेच भुयारी मार्ग थेट दिल्ली, हिसार, लाहोरमध्ये जातात, असेही म्हटले जाते. मात्र इतिहासात असा कोणताही उल्लेख नाही. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

फारशी भाषेतील एका अभिलेखानुसार या विहिरीची निर्मिती मुघल शासक शाहजहानच्या काळात 1658-59 साली करण्यात आली. या विहिरीत उतरण्यासाठी 110 पायऱ्या उतराव्या लागतात. मात्र योग्य ती काळजी न घेतल्याने ही विहीर आता मोडकळीस आली आहे. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

या भागात एक चोर होता. हा चोर श्रीमंत लोकांना लुटायचा आणि लुटलेले सोने, दागिने या विहिरीत उडी मारून लपवून ठेवायचा. त्याने लपवलेले सोने अजूनही इथेच आहे, असा दावा केला जातो. मात्र संशोधकांनी तसेच इतिहासकारांनी हा दावा फेटाळून लावलेला आहे. (या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही.) (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)