
जेव्हा जेव्हा स्विट्स म्हणजेच मिठाईचा विषय असतो, तेव्हा तेव्हा पश्चिम बंगाल या राज्याचे नाव प्राधान्याने घेतले जाते. या देशात अनेक प्रकारच्या मिठायांचा शोध लावण्यात आलेला आहे. याच राज्यात 1868 मध्ये कोलकाता शहरात रसगुल्ले शोधण्यात आलेले आहेत.

पश्चिम बंगालमधील चंद्र दास यांनी बाग बाजारात रसगुल्ल्यांचा शोध लागला. आजघडीला रसगुल्ला हा गोड पदार्थ फक्त पश्चिम बंगालच नव्हे तर जगभरात आवडीने खाल्ले जातात. पश्चिम बंगालमध्ये 14 नोव्हेंबर हा दिवस रसगुल्ला दिन म्हणून साजरा केला जातो.

पश्चिम बंगालमध्ये अनेक पारंपरिक मिठाया आहेत. आज पश्चिम बंगालमध्ये संदेश, मिष्टी दोई, चम्मच, लेडीकेनी, पोंटुआ, सीता भोग, मिहीदाना अशा प्रकारच्या पारंपरिक मिठाया आहेत. पश्चिम बंगालमध्ये बेक्ड रसगुल्ला, कॉकलेट संदेश, मँगो जेलॅटो संदेश अशा प्रकारच्या मिठाया आवडीने खाल्ल्या जातात.

पश्चिम बंगालमध्ये मिठाई तयार करणे हा फक्त व्यवसाय नाही. इथे मिठाई तयार करण्याची मोठी परंपरा आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्येही वेगवेगळ्या भागाची आपापली अशी खास मिठाई आहे.

शक्तीगड या भागात लेंगचा आणि बर्धमान येथील सीता भोग सर्वात प्रसिद्ध स्थानिक मिठाया आहेत. त्यामुळेच पश्चिम बंगाल हे राज्य अनेक प्रकारच्या मिठायांचे उगमस्थान मानले जाते. इथे तयार झालेल्या मिठाया देशभरात आवडीने खाल्ल्या जातात.