फक्त बिअर, रम नव्हे तर दारुचे हे प्रकारही एकदम भारी; जगभरात आहेत प्रसिद्ध!

मद्याचे अनेक प्रकार आहेत. अनेकांना फक्त बिअर, व्हिस्की रम असेच प्रकार माहिती आहेत. परंतु जगभरात वेगवेगळ्य प्रकारचे मद्य आवडीने पिले जाते.

| Updated on: Dec 16, 2025 | 6:50 PM
1 / 5
आजघडीला भारतात लाखो लोक मद्यप्राशन करतात. विशेष म्हणजे काही लोक तर मद्याचे प्रेमात असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मद्यं प्राशन करायला आवडते. अनेकांना फक्त बिअर, रम असेच मद्याचे प्रकार माहिती आहेत. परंतु मद्याचे इतरही काही प्रकार आहेत, जे जगभरात प्रसिद्ध आहेत.

2 / 5
जगभरात वाईन हा मद्याचा प्रकारदेखील फारच प्रसिद्ध आहे. द्राक्षांपासून वाईन तयार केली जाते. द्राक्षांव्यतिरिक्त इतरही काही फळांपासूनही वाईन तयार केली जाते.  रेड, व्हाईट, रोज, स्पार्कलिंग असे वाईनचे काही प्रकार आहेत. वाईनची चव ही प्रदेश, द्राक्षाचा प्रकार तसेच वाईन तयार करण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते.

3 / 5
सायडर हा मद्याचा प्रकार सफरचंदाला आंबवून तयार केले जाते. साईडर हा मद्याचा प्रकार गोड असतो. तसेच स्टिल आणि स्पर्कलिंग असे सायडरचे दोन प्रकार आहेत. मद्याचा फोर्टीफाईड वाईन हा देखील एक प्रकार आहे. यामध्ये शेरी, पोर्ट आणि वर्माऊथ अशा प्रकारच्या वाईनचा समावेश होतो.

4 / 5
मीड हादेखील मद्याचा एक प्रकार आहे. मध आणि पाण्याला अंबवून हे मद्य तयार केले जाते. कधीकधी यात फळ, मसाले, धान्य मिसळले जाते. ही जगातील सर्वाधिक जुन्या मद्यांपैकी एक मानले जाते. मद्याचा ब्रँडी हा आणखी एक प्रकार आहे. हे एक डिस्टिल्ड मद्य आहे.

5 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा. मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. आम्ही मद्यप्राशन करण्यास प्रोत्साहन देत नाही.)