‘मोहब्बतें’ चित्रपटातील ही अभिनेत्री आता कशी दिसते? 26 वर्षात झाला इतका बदल की ओळखणंही कठीण
'मोहब्बतें' या चित्रपटातून लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री आता कशी दिसते? करिअरच्या शिखरावर असताना सोडली इंडस्ट्री. कोण आहे ती अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली; मात्र कालांतराने त्या रुपेरी पडद्यापासून दूर गेल्या. ‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्री प्रीति झंगियानी ही त्यापैकीच एक. आज, 18 ऑगस्ट रोजी प्रीती आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे.

प्रीतीने आपल्या करिअरची सुरुवात 1997 मध्ये राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘ये है प्रेम’ या म्युझिक अल्बममधून केली. त्यानंतर ती काही जाहिरातींमध्येही झळकली. अभिनयाच्या क्षेत्रात तिने सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटांमधून पाऊल ठेवलं. 1999 मध्ये ती मल्याळममधील ‘मझविल’ आणि त्यानंतर तेलुगू चित्रपट ‘थम्मुडू’मध्ये दिसली.

यानंतर 2000 साली प्रीतीला ‘मोहब्बतें’ या गाजलेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळाली. अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला ‘स्टार डेब्यू ऑफ द ईयर फिमेल’ हा आयफा पुरस्कारही मिळाला.

‘मोहब्बतें’नंतर प्रीती अनेक चित्रपटांमध्ये झळकली. हिंदीसोबतच तिने तेलुगू, तमिळ, कन्नड, पंजाबी, बंगाली आणि राजस्थानी चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र, ‘मोहब्बतें’सारखं मोठं यश तिच्या वाट्याला पुन्हा आलं नाही.

दरम्यान, अभिनयापासून दूर असतानाही प्रीतीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. ‘मोहब्बतें’मध्ये साध्या-सोज्वळ अंदाजात दिसलेली प्रीती आता मात्र पूर्वीपेक्षा अधिक ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना तिला ओळखणंही कठीण जातं.