
'दंगल' चित्रपटादरम्यान अभिनेता आमिर खानने त्याला असलेल्या फोबियाबद्दल सांगितले होते. त्याने सांगितले होते त्याला मरणाची खूप भीती वाटते

सोनम कपूरला क्लिथ्रोफोबिया आहे. तिला अडकून पडण्याची भीती वाटत राहते. त्यामुळे टी म्हणाली की ती नेहमी लिफ्टऐवजी पायऱ्या चढणे पसंत करते.

बॉलीवूड किंगखान म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या शाहरुख खानालाही भीती वाटते. हॉर्स राइडिंग कूल मानली जाते, पण शाहरुख खान घोडेस्वारीला घाबरतो.

मेडिया रिपोर्टच्या नुसार अभिनेता रणबीर कपूर झुरळ व कोळ्याला खूप घाबरतो अशी माहिती समोर आली आहे.

सापांच्या विषारीपणाची सर्वांनाच कल्पना आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला सापांची भीती वाटते. याला Ophidiophobia म्हणतात.

अभिनेता अजय देवगण 'रनवे 34'च्या प्रमोशन दरम्यान एका टीव्ही शोमध्ये बोलत होता. तेव्हा अजय देवगण म्हणाला, काही वर्षांपूर्वी तो काही लोकांसोबत लिफ्टमध्ये अडकला होता. तेव्हापासून त्याला लिफ्टमध्ये क्लॉस्ट्रोफोबिक वाटते. त्याने सांगितले की जेव्हाही तो लिफ्टमध्ये चढतो तेव्हा तो थोडा घाबरतो.