Salman Khan : हे खास पेय म्हणजे सलमान खानचा जीव की प्राण, नाव वाचून थक्कच व्हाल, किंमत नेमकी किती?
सलमान खानचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्याच्या कपड्यांची, फॅशनची नक्कल करून थाटात मिरवणारे शेकडो तरुण तुम्हाला पाहायला मिळतील. सलमान खान आपल्या आरोग्याची खूपच काळजी घेतो.

सिने कलाकाराचं आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय असतं. त्यांच्या खासगी आयुष्यात ते काय करतात? ते कोणाच्या प्रेमात आहेत, याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. बॉलिवुडचा दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानची तर वेगळीच क्रेझ असते.

सलमान खानचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्याच्या कपड्यांची, फॅशनची नक्कल करून थाटात मिरवणारे शेकडो तरुण तुम्हाला पाहायला मिळतील. सलमान खान आपल्या आरोग्याची खूपच काळजी घेतो.

फिट राहण्यासाठी तो नियमित व्यायाम करतो. व्यायाम करण्यासोबतच तो आहाराच्या बाबतीतही खूपच जागरूक आहे. शरिरिला पचेल तेच आणि आरोग्यासाठी चांगले असणारेच अन्नपदार्थ तो खातो.

दरम्यान, सलमान खान मद्यप्राशन करतो की नाही, याबाबत नेमकी माहिती नाही. परंतु एक पेय मात्र त्याच्या खूपच आवडीचे आहे. हे नाव ऐकून तुम्हीही चकितच व्हाल. विशेष म्हणजे तुम्हालाही परडेल असे हे पेय आहे.

सलमान खानला ग्रीन टी खूपच आवडते. ग्रीन टी ही आरोग्यासाठी खूप लाभदायी असते, असे म्हटले जाते. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान ग्रीन टी पितो, असं सांगितलं जातं. अन्य पेयांपेक्षा त्याला ग्रीन टी खूप आवडते.