Lek Ladki Yojana : राज्यात लाडक्या लेकींना 1,01,000 रुपये देणारी ‘लेक लाडकी’ योजना काय आहे? कसा लाभ मिळतो?

लेक लाडकी योजना ही महिला व बाल विकास विभागामार्फत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आणि मुलींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

| Updated on: Oct 31, 2026 | 10:02 PM
1 / 5
लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी 2.0 पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करून अर्ज नोंदणी ते अर्जाची सद्यस्थिती पाहण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

2 / 5

यापूर्वी लेक लाडकी योजनेसाठी अर्जदारांना नजीकच्या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन अर्ज जमा करावा लागत होता. त्यानंतर हे अर्ज प्रकल्प स्तरावर एकत्रित करून तत्कालीन पोर्टलवर त्यांची नोंदणी केली जात होती.

3 / 5

लेक लाडकी योजना ही महिला व बाल विकास विभागामार्फत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आणि मुलींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

4 / 5

1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेअंतर्गत जन्मानंतर रु.5,000, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर रु 6,000, सहावीत प्रवेश घेतल्यावर रु 7,000, अकरावीत प्रवेश घेतल्यावर रु 8,000 आणि मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर रु 75,000, असा एकूण 1,01,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.

5 / 5

योजनेसाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आणि शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्न व इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत आज पर्यंत पहिला लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2,98,695 इतकी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us