Vaibhav Suryawanshi : अखेर वैभव सूर्यवंशीच्या बॅटचं ते सिक्रेट समोर, या एका कारणामुळे पाडतो धावांचा पाऊस!

वैभव सूर्यवंशी अवघ्या 15 वर्षाचा आहे. परंतु तो मैदानात फलंदाजीसाठी आला की भलभले गोलंदाज घाबरतात. तो मैदानात चौकार आणि षटकार यांचा पाऊसच पाडतो. त्याच्या बॅटची नेहमीच चर्चा होते.

| Updated on: May 31, 2026 | 6:09 PM
1 / 5
राजस्थान रॉयल्स संघाचा सर्वात कमी वयाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी आज देशात चर्चेचा विषय आहे. तो मैदानावर फलंदाजीसाठी उतरल्यावर चौकार आणि षटकार यांचा पाऊसच पडतो.

2 / 5
त्याच्या खेळाचे आज सगळेच कौतुक करत आहेत. दरम्यान, वैभव सूर्यवंशी एवढी तुफानी फलंदाजी नेमकी कशी करू शकतो, असे सगळेच विचारत आहेत. तो त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग तर ठेवत नाही ना? असं अनेकजण हसत हसत आणि कौतुकाने म्हणतात.

3 / 5
दरम्यान, त्याच्या याच बॅटचे रहस्य आता समोर आले आहे. वैभव सूर्यवंशी नेमकं कोणत्या बॅटने खेळतो, त्याच्या बॅटचे वजन किती असते हे जाणून घेऊ या. वैभव अगोदर क्रिकेट खेळताना 1100 ग्रॅम वजनाच्आ बॅटने खेळायचा.

4 / 5
परंतु आता वैभव सूर्यवंशी  1.15 ते 1.18  किलो वजनाची बॅट वापरता. याच बॅटने तो मैदानात फलंदाजी करतो. विशेष म्हणजे इतर खेळाडूंप्रमाणेच त्याचीही बॅट सर्वसामान्य आहे. त्याचे बॅट निर्मितीसाठी कोणतेही अन्य घटक वापरले जात नाहीत.

5 / 5
वैभव सूर्यवंशी वयाने फक्त 15 वर्षांचा आहे. परंतु इतर खेळाडूंच्या तुलनेत तो बरीच वजनदार बॅट वापरतो. त्याच्या बॅटचे वजन जास्त असल्याने त्याला लांब पल्ल्याचे फटके मारता येतात. बॅटचे वजन जास्त असल्याने त्याने फटका लगावल्यावर चेंडूला जास्त गती मिळते, असेही सांगितले जाते.

Follow Us