पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की कोणता फोन वापरतात? तुम्हाला तो खरेदी करता येतो का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की कोणता फोन वापरतात? त्यांच्या फोनची वैशिष्ट्ये आणि सुरक्षा याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: Apr 06, 2026 | 1:35 PM
1 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा साधेपणा आणि डिजिटल इंडियासाठी घेतलेला पुढाकार नेहमीच चर्चेत असतो. जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. पण पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विषय येतो, तेव्हा त्यांच्या संवादाची गोपनीयता हा राष्ट्रीय सुरक्षेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा साधेपणा आणि डिजिटल इंडियासाठी घेतलेला पुढाकार नेहमीच चर्चेत असतो. जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. पण पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विषय येतो, तेव्हा त्यांच्या संवादाची गोपनीयता हा राष्ट्रीय सुरक्षेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनतो.

2 / 8

अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात आणि तो किती सुरक्षित असतो, याबाबत सर्व सामान्यांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत संवादासाठी रॅक्स (RAX - Restricted Area Exchange) या विशेष फोनचा वापर केला जातो.

3 / 8

हा फोन कोणत्याही खाजगी कंपनीने बनवलेला नसून, भारत सरकारच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स' (C-DOT) या संस्थेने विकसित केला आहे. या फोनमध्ये लष्करी दर्जाच्या सुविधा असतात. ज्यामुळे दोन व्यक्तींमधील संभाषण तिसरी व्यक्ती किंवा कोणतीही टेलिकॉम कंपनी ऐकू शकत नाही.

4 / 8

हा फोन सामान्य इंटरनेट नेटवर्कशी जोडलेला नसतो. तो एका खास फ्रिक्वेन्सी बँडवर आणि अनेकदा सॅटेलाइट लिंकद्वारे काम करतो, ज्यामुळे तो हॅक करणे अशक्य मानले जाते. हा फोन बाजारात खरेदीसाठी उपलब्ध नसून, तो केवळ व्हीव्हीआयपी आणि अतिसंवेदनशील पदांवरील व्यक्तींसाठीच डिझाईन केलेला आहे.

5 / 8

सोशल मीडिया अपडेट्स किंवा सेल्फी घेताना पंतप्रधानांच्या हातात अनेकदा आयफोन (iPhone) दिसून येतो. अँड्रॉइडच्या तुलनेत आयफोनची क्लोज्ड इकोसिस्टम अधिक सुरक्षित मानली जाते, हे त्यामागचे मुख्य तांत्रिक कारण आहे.

6 / 8

मात्र, मोदी वापरत असलेला आयफोन हा सर्वसामान्य आयफोनसारखा नसतो. त्यामध्ये सरकारी यंत्रणांनी विशेष सिक्युरिटी पॅचेस इन्स्टॉल केलेले असतात. या फोनमधील सॉफ्टवेअर अत्यंत कडक देखरेखीखाली असते. त्यात सामान्य ॲप्सऐवजी केवळ सुरक्षित आणि मर्यादित सुविधा असतात.

7 / 8

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल सुरक्षेची जबाबदारी SPG (Special Protection Group) आणि NTRO (National Technical Research Organisation) या संस्थांकडे असते. पंतप्रधान कधीही कोणत्याही असुरक्षित वाय-फाय (Wi-Fi) नेटवर्कला फोन कनेक्ट करत नाहीत.

8 / 8

तसेच त्यांच्या प्रत्येक कॉलची तांत्रिक तपासणी केली जाते आणि फोनमधील डेटा दररोज मॉनिटर केला जातो. पंतप्रधान मोदी हे तंत्रज्ञानप्रेमी असले तरी ते तासनतास फोनवर व्यस्त राहणे टाळतात. त्यांचे बहुतांश अधिकृत कॉल्स त्यांच्या कर्मचारी वर्गामार्फत किंवा प्रधान सचिवांमार्फत हाताळले जातात. ते गॅजेट्सचा वापर केवळ गरजेपुरता करून प्रत्यक्ष कामाला आणि फाईल्सना अधिक वेळ देतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us