
नेहमी लोक एसी अत्यंत कमी तापमानात म्हणजे 16-18 डिग्री सेल्सियसवर चालवतात. त्यामुळे कॉप्रेसरवर दबाव पडतो. विजेचा वापर वाढतो. साधारणपणे एसीसाठी 24 डिग्री सेल्सियस तापमान आदर्श मानले जाते. हा आरामदायक आहे.

एसीची नियमित स्वच्छता केली नाही तर त्याच्या फिल्टरमध्ये घाण आणि धूळ साचते. त्यामुळे एसीला हवा खेचणे आणि थंड करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. पर्यायाने विजेचा वापर वाढतो. यामुळे वर्षातून एक वेळा सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे.

एसी चालवताना खोलीचे दरवाजे-खिडक्या सुरु ठेवल्याने थंड हवा बाहेर जाते. तसेच बाहेरची गरम हवा आत येते. यामुळे खोली थंड ठेवण्यासाठी एसीला जास्त काम करावे लगते. पर्यायाने वीज बिल वाढते. म्हणून एससी सुरु असताना दरवाजे, खिडक्या बंद असाव्यात.

खोलीच्या साइजप्रमाणे एसीची निवड करावी. कमी क्षमतेच्या एसीची निवड करणे विजेचा अपव्यय आहे. लहान एसी मोठी खोली थंड करण्यासाठी जास्त वेळ आणि वीज घेतो. परंतु मोठा एसी छोटी खोली लवकर थंड करतो.

खोलीत सरळ ऊन येत असेल तर खोलीचे तापमान वाढते. त्यामुळे एसीला खोली थंड करण्यासाठी जास्त मेहनत लागते. पर्यायाने विजेचा वापर वाढतो. ऊन थांबवण्यासाठी खिडक्यांवर मोठे पडदे लावा.