ड्राइव्हिंग लायसन्स हरवलंय? काळजी करू नका, असं मिळवू शकता डुप्लिकेट लायसन्स

ड्राइव्हिंग लायसन्स हरवल्यावर काय करावं, हे अनेकांना माहीत नसतं. डुप्लिकेट लायसन्स कसा मिळवायचा, त्यासाठी अर्ज कुठे करायचा याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. त्याचप्रमाणे ड्राइव्हिंग लायसन्स हरवल्यानंतर सर्वप्रथम काय करावं, तेसुद्धा वाचा...

| Updated on: Jun 08, 2025 | 10:47 AM
1 / 5
ड्राइव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालक परवाना कागदपत्र असल्याशिवाय तुम्ही गाडी चालवू शकत नाही. परंतु हेच लायन्स कधी हरवलं किंवा खराब झालं तर काय करावं हे अनेकांना माहीत नसतं. तर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने आपण डुप्लीकेट ड्राइव्हिंग लायसन्स कसं काढू शकतो, ते जाणून घेऊयात..

2 / 5
ऑनलाइन प्रक्रियेसाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. होमपेजवर ड्राइव्हिंग लायसन्सशी संबंधित ऑप्शन निवडा. त्यात डुप्लिकेट ड्राइव्हिंग लायसन्सचा पर्याय निवडा. त्यात तुमचं नाव, पत्ता, ड्राइव्हिंग लायसन्स नंबर, जन्मतारीख आणि इतर विचारलेली माहिती भरा.

3 / 5
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा. डुप्लिकेट लायसन्सच्या अर्जासाठी लागणारं शुल्क भरा. शुल्क भरल्यानंतर एक पावती मिळेल. त्यावर अर्ज क्रमांक नमूद असेल. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनंतर तुमच्या पत्त्यावर डुप्लिकेट लायसन्स पाठवला जाईल.

4 / 5
ऑफलाइन अर्जासाठी तुम्हाला जवळच्या आरटीओ कार्यालयात जावं लागेल. तिथे डुप्लिकेट लायसन्स मिळवण्यासाठी एक अर्ज भरावा लागेल. त्या अर्जासह आवश्यक ती कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि पासपोर्ट साइज फोटो जमा करा. अर्ज शुल्क जमा केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल, त्यावर अर्ज क्रमांक नमूद असेल. त्यानंतर तो लायसन्स तुमच्या घरच्या पत्त्यावर येईल.

5 / 5
ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केला तरी अनेकदा लायसन्स हाती येण्यास एक ते दीच महिन्याचा कालावधी लागतो. अशा वेळी डिजिलॉकर या सरकारमान्य अधिकृत अॅपद्वारे तुम्ही ऑनलाइन लायसन्स मिळवू शकता. शिवाय लायसन्स हरवला असेल तर सर्वांत आधी तुम्हाला पोलिसांत एफआयआर फाइल करावी लागेल. त्यानंतर डुप्लिकेट लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल.