
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या तर सोने आणि चांदीचे भाव चांगलेच घसरले आहेत. दिवाळीच्या काही दिवस अगोदर या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव आपल्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता.

दरम्यान, आता सोने, चांदीमध्ये गुंतवणुकीचा विचार लक्षात घेता सोने आणि चांदीचा भाव कमी झाल्यानंतर भविष्यातही अशीच घसरण पाहायला मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या

तज्ज्ञांच्या माहितीनुसार आगामी आठवड्यात या दोन्ही धातूंचा भाव काही काळासाठी स्थिर राहण्याची शक्यता आहे. तरीदेखील सोन्याच्या भावात घट होणार की भाव वाढणार हे पाहण्याासठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. केंद्रीय बँकांच्या बैठका, जागतिक व्यापार संघटनांची भूमिका यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

सोबतच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याज नीतिकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. सोबतच फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या विधानांकडे तसेच ते नेमकी काय घोषणा करतात, यावरही सोने, चांदीचा भाव अवलंबून आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)