
1988 साली आलेल्या दयावान चित्रपटात माधुरी दीक्षित आण विनोद खन्ना लीड रोलमध्ये होते. दोघांमध्ये बरेच इंटीमेट सीन्स पहायला मिळालेले. त्या काळातील हा खूप बोल्ड चित्रपट ठरलेला. खास बाब म्हणजे माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्या वयात 21 वर्षांच अंतर होतं.

दोघांमध्ये एक किसींग सीन चित्रित करण्यात आलेला. माधुरी त्यावेळी फक्त 21 वर्षांची होती. विनोद खन्ना 42 वर्षांचा होता. पडद्यावर त्यांची कमेस्ट्री हिट ठरलेली. त्यावेळी माधुरी इंडस्ट्रीमध्ये नवीन होती. विनोद खन्नाने आपली ओळख बनवली होती. तो सुपरस्टार होता.

त्यावेळी असं बोललं जातं की, माधुरी सोबत किसींग सीन करताना विनोद खन्नाच नियंत्रण सुटलेलं. त्यामुळे माधुरी दीक्षित खूपच अस्वस्थ झालेली. बॉलिवूड शादीजच्या रिपोर्टनुसार किसिंग सीनच्यावेळी कट बोलल्यानंतर विनोद खन्ना थांबले नव्हते. त्यामुळे माधुरी रडायला लागलेली. त्यानंतर विनोद खन्नाने माधुरीची माफी मागितली.

तिने चित्रपटाचा डायरेक्टर फिरोज खानकडे या बद्दल तक्रार केलेली. असही ऐकायला आलेलं की, विनोद खन्नाचे वडिलही मुलाचे रोमँटिक सीन्स बघून हैराण झालेले. विनोद खन्नाचे वडिल तसे त्याच्या चित्रपटाच्या प्रीमियरला फार यायचे नाहीत. पण त्यावेळी चित्रपटात मुलाचे किसिंग सीन्स पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसलेला.

या चित्रपटाची गाणी सुपरहिट ठरलेली. 'आज फिर तुमपे प्यार आया हैं' हे रोमँटिक गाणं आजही फेमस आहे.