
जर तुम्हाला विचारलं की जगातील सर्वात श्रीमंत शहर कोणतं तर तुम्हाला निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र आता नुकताच याबाबतचा एक रिपोर्ट समोर आला आहे. शहरात राहणाऱ्या लोकांच्या खासगी मालमत्तेच्या आधारे हा सर्व्हे करण्यात आला आहे.

हेनले अॅण्ड पार्टनर्स या संस्थेद्वारे हा संशोधन अहवाल सादर करण्यात आला आहे. या संस्थेनं सादर केलेल्या अहवालामध्ये जगातील सर्वात श्रीमंत शहरामध्ये एकूण तीन लाख चाळीस हजार करोडपती लोक राहतात. जगातील सर्वात श्रीमंत शहराच्या यादीमध्ये टोकीयोचा दुसरा क्रमांक लागतो.

या रिपोर्टनुसार टोक्योमध्ये दोन लाख नव्वद हजार करोडपती लोक राहतात. जगभरातील प्रमुख नऊ देशांचा अभ्यास करून हा रिपोर्ट हेनले अॅण्ड पार्टनर्स या संस्थेनं केला आहे. ज्यामध्ये 97 शहरांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यात आला होता.

या रिपोर्टनुसार सर्वात श्रीमंत शहराच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर टोकीयो शहराचा समावेश होतो. टोकीयोमध्ये एकूण 2 लाख 90 हजार करोडपती लोक राहतात.तर तिसऱ्या क्रमाकांवर लॉस एंजिल्स आणि शिकागो या शहरांचा समावेश होतो

या रिपोर्टनुसार सर्वात श्रीमंत देशाच्या यादीमध्ये लंडन शहर चौथ्या क्रमांकावर आहे. लंडनमध्ये एकूण दोन लाख 58 हजार करोडपती लोक राहतात.

या रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर लंडन, तर पाचव्या क्रमांकावर बे एरिया या शहराचा नंबर लागतो.

आता पाहुयात जगातील सर्वात श्रीमंत शहर कोणतं? हेनले अॅण्ड पार्टनर्स या संस्थेद्वारे सादर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात श्रीमंत शहराच्या यादीमध्ये न्यूयॉर्क हे शहर प्रथम क्रमांकावर आहे. न्यूयॉर्क शहराला द बिग अॅप्पल म्हणून देखील ओळखलं जातं.