
मॉलमध्ये म्हटलं की शॉपिंगची धमाल असते. एकदा मॉलमध्ये गेलं की तुम्हाला अनेक वस्तू घेण्याची इच्छा होते. विशेष म्हणजे मॉलमध्ये तुम्हाला गरजेच्या असणाऱ्या सर्वच वस्तू असतात. म्हणूनच अनेकजण मॉलमध्येच शॉपिंग करतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मॉलमध्ये तुम्हाला एकाच अनेक ब्रँडच्या वस्तू मिळतात. म्हणजेच तुम्हाला सर्वोत्तम वस्तू निवडण्याची संधी असते. काही काही मोठ्या मॉलमध्ये तर कपडे, सौंदर्यप्रसाधनांपासून ते मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूदेखील मिळतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

म्हणजेच मॉलमध्ये तुम्हाला संसारासाठी लागणाऱ्या आणि फॅशन म्हणून हव्या असणाऱ्या अशा सर्व वस्तू मिळतात. परंतु मॉलमध्ये लोक सर्वाधिक कोणत्या वस्तूंची खरेदी करतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्याबाबत जाणून घेऊ या.. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

तरुणांमध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची क्रेझ असते. त्यामुळे तरुण-तरुणी मॉलमध्ये कपडे मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मॉल्सची वाढती मागणी लक्षात घेऊन आता मोठ्या शहरांत वेगवेगळे मॉल्स उघडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मॉलमध्ये लोक कपडे, दागिने, सौंदर्य प्रसाधने यांची सर्वाधिक खरेदी करतात. सोबतच अनेकजण मोबाईल, टीव्ही यासारख्या इलेक्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यासाठीही मॉलमध्येच जातात. मॉलमध्ये इतरही अनेक वस्तू ऑफरमध्ये मिळतात. त्यामुळेच अनेकजण शॉपिंगसाठी मॉलमध्ये जाणे पसंद करतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)