
अनलॉकनंतर आता प्रत्येक जण बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हे फोटो बघून तुमचं चित्त जागेवर राहणार नाही हे खरं आहे.

ही दृश्यं आहेत जम्मू-काश्मीरमधील. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात आता हिमवर्षाव सुरू झाला आहे.

हिलस्टेशन गुलमर्ग-पहलगाम येथे आता मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे आता या भागाचं सौंदर्य आणखीच खुलून गेलं आहे.

झालेल्या वर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यात बर्फाची पांढरी चादर पाहायला मिळत आहे.

अती बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.

बर्फवृष्टीमुळे पर्यटन व्यवसायात आता नवीन उत्साह पाहायला मिळतोय.

दरवर्षी हिवाळा सुरू झाला की या भागात पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र यावर्षी कोरोनामुळे इथे शुकशुकाट पाहायला मिळत आहे.