आदेश बांदेकरांची होणारी सून आहे तरी कोण? लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजणार असल्याची चर्चा आहे. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. बांदेकरांची होणारी सून कोण आहे, ते पहा..

| Updated on: Aug 19, 2025 | 10:18 AM
1 / 5
आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोहमने आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय.

2 / 5
मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी तो लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. ही अभिनेत्री आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तर या अभिनेत्रीचं नाव आहे पूजा बिरारी.

3 / 5
पूजा बिरारी सध्या 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारतेय. त्याआधी तिने 'साजणा' आणि 'स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

4 / 5
इन्स्टाग्रामवर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स असून चाहत्यांसोबत ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. पूजा अभिनेत्री आणि मॉडेलसुद्धा आहे. तिच्या मॉडेलिंगचेही फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात.

5 / 5
पूजाला नृत्याचीही खूप आवड आहे. तर दुसरीकडे सोहम हा मालिकांच्या निर्मिती क्षेत्रात आपली वेगळी निर्माण करतोय. 'ठरलं तर मग', 'घरोघरी मातीच्या चुली' यांसारख्या लोकप्रिय मालिकांच्या निर्मितीची जबाबदारी तो सांभाळतोय.