मुंगी चावली की कावळ्याला मिळतो पुनर्जन्म, हा चमत्कार वाचून थक्क व्हाल!

कावळा हा फारच अजब असा पक्षी आहे. शरीरावर मुंग्यांनी चावा घ्यावा म्हणून कावळा अक्षरश: प्रयत्न करतो. मुंगी चावली की कावळ्याला जीवदानच मिळते.

Updated on: Nov 29, 2025 | 6:02 PM
1 / 5
निसर्ग हा अनेक चमत्कारांनी भरलेला आहे. काही प्राणी तर फारच चमत्कारिक पद्धतीने वागतात. विशेष म्हणजे यात पक्षीदेखील मागे नाहीत. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी काही पक्षी तर अचंबित करून टाकणाऱ्या कृती करतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
यामध्ये कावळा या पक्ष्याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. स्वत:चा जीव वाचावा यासाठी कावळा थेट मुंग्यांना स्वत:वर हल्ला करू देतो. कावळा मुंग्यांना थेट चावा घेण्याची मुभा देतो. विशेष म्हणजे यामुळे कावळ्याचा जीव वाचतो.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
कावळा असं नेमकं का करतो, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण यामागे फार महत्त्वाचे कारण आहे. मुंग्या जेव्हा कावळ्यावर हल्ला करतात, तेव्हा त्या कावळ्याच्या शरीरावर फॉर्मिक अॅसिड नावाचा घटक सोडतात.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
हेच फॉर्मिक अॅसिड कावळ्यासाठी एक औषध म्हणून काम करते. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी कावळे मुंग्यांचे वारूळ उद्ध्वस्त करताना दिसतात. कावळे मुंग्यांना हल्ला करू देतात. मुंग्या चावा घेत असताना कावळे मस्तपैकी आपले पंख पसरून निवांत बसून राहतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
मुंग्यांमध्ये असलेले फॉर्मिग अॅसिड हे अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल असते. कावळ्याच्या पंखात परजीवी फंगस असतात. हेच फंगस, बॅक्टेरिया नष्ट व्हावेत म्हणून कावळे मुंग्यांना चावा घेऊ देतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)