नागराज मंजुळेने पहिल्या पत्नीला का दिला घटस्फोट? पोटगीची रक्कम किती होती?

नागराज मंजुळे यांची दोन लग्न झाली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांची पहिली पत्नी सध्या कुठे आहे? काय करते? तिला पोटगी म्हणून किती रुपये दिले होते वाचा...

| Updated on: Jul 07, 2026 | 6:10 PM
1 / 7
मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. त्यांच्या "सैराट", "फँड्री" आणि "पिस्तुल्या" यांसारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली आहे. सैराटसह नागराज यांच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि पसंती दिली. एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराज यांची ओळख बनलीय. एकीकडे दिग्दर्शक म्हणून नाव होत असताना, त्यांचे वैयक्तिक जीवन, विशेषतः त्यांच्या पहिल्या पत्नी सुनिता मंजुळे यांच्याशी असलेले नाते, वादग्रस्त ठरले आहे.

2 / 7
नागराज मंजुळे आणि सुनिता यांचे लग्न 1997 मध्ये झाले. अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. तेव्हा ते केवळ 19 वर्षांचे होते आणि ते बारावीच्या वर्गात शिकत होते. सुनिता, ज्या त्यावेळी 18-19 वर्षांच्या होत्या. नागराज यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या गावी, म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे राहत होत्या. मात्र त्यांचा सुखी संसार फार काळ काही टिकला नाही.

3 / 7
दोघांच्या संसारातील अनेक वादविवाद उफाळून येऊ लागले. अखेर २०१४ साली कागदोपत्री ते विभक्त झाले. सुनिता यांनी सांगितले की, नागराज हे कुटुंबातील सर्वात मोठे भाऊ असल्याने त्या सर्वात मोठ्या सून होत्या आणि त्यांना संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. त्या घरकामात व्यस्त राहत असत, तर नागराज त्यांच्या शिक्षण आणि चित्रपट निर्मितीच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करत होते.

4 / 7
सुनिता यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणींचा सामना केल्याचे सांगितले आहे. त्यांनी दावा केला की, नागराज यांनी त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत गावात सोडले आणि स्वतः पुण्यात राहत होते. यामुळे त्यांच्यातील संपर्क कमी झाला. सुनिता यांनी असा आरोप केला की, नागराज यांनी त्यांना भावनिक आणि शारीरिक त्रास दिला. त्यांनी तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले आणि विरोध केल्यावर मारहाण केली, असे त्यांचे म्हणणे आहे.

5 / 7
नागराज यांच्या करिअरला यश मिळू लागले, विशेषतः त्यांच्या "पिस्तुल्या" या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर, त्यांनी सुनिता यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. सुनिता यांनी सांगितले की, जेव्हा नागराज यांना पुरस्कारासाठी दिल्लीला जावे लागले, तेव्हा त्यांनी सुनिता यांना घरीच सोडले आणि कुटुंबासोबत गेले.

6 / 7
नागराज आणि सुनिता यांचा घटस्फोट 10 नोव्हेंबर 2014 रोजी पुणे येथील कोर्टात एकमताने झाला. या घटस्फोटानंतर नागराज यांनी सुनिता यांना 7 लाख रुपये पोटगी  म्हणून दिले. तथापि, सुनिता आणि त्यांच्या कुटुंबाने ही रक्कम अपुरी असल्याचे म्हटले, विशेषतः नागराज यांच्या "सैराट" चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर, ज्याने मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमी कमाई केली.

7 / 7
सुनिता यांनी नागराज यांच्यावर केलेले आरोप 2016 मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आले, विशेषतः "सैराट" चित्रपटाच्या यशानंतर. सुनीता यांनी  The Quint यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैवाहिक जीवनातीबद्दल माहिती दिली. त्यावेळी त्यांनी दावा केला की, नागराज यांनी त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, त्यांना त्यांच्या यशात सहभागी होऊ दिले नाही आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या उपेक्षित ठेवले.

Follow Us