Nana Patekar: कोट्यवधींची संपत्ती, पण नाना सिंहगडाच्या पायथ्याशी का राहायचे? अखेर कारण आले समोर
Nana Patekar: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे कायम त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जायचे. ते सर्व शहरांपासून दूर सिंहगडाच्या पायथ्याशी रहायचे. ते तिकडे का राहायचे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृ्ष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आज आपल्यामध्ये नाहीत. मात्र, त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
नाना पाटेकर हे प्रसिद्ध अभिनेते असले तरी देखील ते त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जायचे. अभिनेते मकरंद अनासपुरे आणि नाना यांची मैत्री कायमच चर्चेत असायची. दोघांनी उभ्या केलेल्या नाम फाऊंडेशनच्या मदतीने त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मदत केली.
नाना हे दिग्गज अभिनेते होते, त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती होती. पण नाना कायम साध्या लूकमध्ये असायचे. ते झगमगाटाच्या दुनियेपासून कायम लांब राहायचे. ते सिंहगडाच्या पायथ्याशी रहायचे. ते शहरांपासून लांब का राहायचे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाब मकरंद अनासपुरे यांनी खुलासा केला आहे.
मकरंद अनासपुरे एका मुलाखतीत म्हणाले, "नानांना कृत्रिमपणा आणि खोटेपणा अजिबात आवडायचा नाही. त्यांची 'नानाची वाडी' सिंहगडाच्या पायथ्याशी होती. ते नेहमी म्हणायचे की, स्वराज्याचे मावळे इथूनच वर चढले असतील. कधीतरी महाराज या रस्त्यावरून गेले असतील. या विचारातून आपल्याला किती अंतःस्फूर्ती मिळेल."
नाना पाटेकर यांना शेतात काम करण्याचीही प्रचंड आवड होती, असेही मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं. 'ते कधी रिकामे बसलेत असं झालंच नाही. ते सतत कामात किंवा काहीतरी करत असायचे. गप्पा मारताना सुद्धा चित्र काढतील, किंवा काहीतरी लिहतील, कविता करतील असं त्यांचं चालायचे' असे मकरंद अनासपुरे म्हणाले.