
महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. पण, तुम्हाला माहितीय का, अमिताभ बच्चन हे त्यांच्या वाढदिवसाचा केक कापत नाहीत.

आज 11 ऑक्टोंबर महानायक अमिताभ बच्चन आपला 82 वा वाढदिवस साजरा करतायत. तुम्हाला माहितीय का? अमिताभ बच्चन कधी आपल्या वाढदिवसाचा केक कापत नाहीत.

जया बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या एपिसोडमध्ये अमिताभ का केक कापत नाहीत? तो खुलासा केला होता.

अमिताभ मिल्क केक आणतात असं जया बच्चन यांनी सांगितलेलं. तो प्रथेचा भाग आहे. अमिताभ भारतीय परंपरेनुसार वाढदिवस साजरा करतात असं जया बच्चन म्हणालेल्या.

हॅप्पी बर्थ डे सुद्धा गायलं जात नाही असं जया बच्चन यांनी सांगितलं. हॅप्पी बर्थ डे ऐवजी 'हर्ष नवं, वर्ष नवं, जीवन उत्कर्ष नवं गायलं जातं' असं जया बच्चन यांनी सांगितलं.