AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंच्या फोटोवर हळदी-कुंक, लिंबू-सुई! ZP Election आधी नको तो प्रकार

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना भयानक प्रकार समोर आला आहे.

एकनाथ शिंदेंच्या फोटोवर हळदी-कुंक, लिंबू-सुई! ZP Election आधी नको तो प्रकार
Eknath ShindeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Feb 07, 2026 | 1:52 PM
Share

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या (ZP Election) मतदानाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट)चे जिल्हाप्रमुख आणि पेनूर गटाचे उमेदवार चरणराज चवरे यांच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवरही असा प्रकार करण्यात आला आहे. त्यांच्या फोटोला टाचण्या टोचून, लिंबू फिरवलेला पाहायला मिळाला.

नेमकं काय घडलं?

चवरे यांच्या राहत्या घरासमोर एका कापडावर लिंबू-मिरची ठेवण्यात आली होती. त्यावर हळद-कुंकू लावले गेले होते. तसेच, प्रचाराच्या पॅम्पलेटवर किंवा फोटोवर सुई खुपसलेली आढळली. या प्रकारामुळे तालुक्यात जादूटोणा किंवा काळ्या जादूच्या चर्चेला जोर धरला आहे. हा प्रकार निवडणुकीच्या अत्यंत निर्णायक टप्प्यात घडला असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

काय आहे पार्श्वभूमी?

मोहोळ तालुक्यातील पेनूर गटातून चरणराज चवरे हे शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चे उमेदवार म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. या गटात त्यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार रामदास चवरे यांची लढत आहे. ही एक तगडी लढत मानली जात असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चवरे यांच्यासाठी सभा घेतली होती. त्यामुळे या गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

चरणराज चवरे यांची प्रतिक्रिया

या प्रकाराबाबत बोलताना चरणराज चवरे म्हणाले, “माझ्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला आहे. खरंतर यामुळे मला आनंद होत आहे. कारण माझ्या सर्वसामान्य जनतेने आणि कार्यकर्त्यांनी विरोधकांना जादूटोण्यापर्यंत आणले आहे. अशा गोष्टींमुळे काही फरक पडणार नाही.”

ते पुढे म्हणाले, “पेनूर गटाची निवडणूक आता सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर तालुक्यातील लोकांनी दाखवून दिलं की, आम्ही चरणराज चवरे यांच्या पाठीशी आहोत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जादूटोण्यासारखे प्रकार करून काही उपयोग होत नाही. त्या लिंबाचा सरबत करून पिण्याची ताकद माझ्यात आहे. चुकीच्या पद्धतीने विरोधकांची डाळ शिजणार नाही.”

निवडणुकीचा संदर्भ

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकार उघडकीस आल्याने मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. चवरे यांनी या घटनेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.