Satara Heatwave News | साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे; दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन
पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता लक्षणीय वाढली असून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात चढला आहे. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. सातारामध्ये सकाळी आणि सायंकाळी काही प्रमाणात हालचाल दिसून येत असली तरी दुपारच्या सुमारास उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता लक्षणीय वाढली असून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात चढला आहे. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. सातारामध्ये सकाळी आणि सायंकाळी काही प्रमाणात हालचाल दिसून येत असली तरी दुपारच्या सुमारास उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. रस्त्यालगत असलेल्या थंडपेयांच्या दुकानांवर मात्र नागरिकांची गर्दी वाढत असून अनेकजण सावलीचा आसरा घेताना दिसत आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांमध्ये तापमानात लक्षणीय फरक आढळून येत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात तापमान सुमारे ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सातारा शहरात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान ३४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. या पार्श्वभूमीवर, वाढत्या उष्णतेचा परिणाम टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
Published on: Apr 15, 2026 04:22 PM
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...

