AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर टॅरिफ वार संपलाच… अमेरिकेत या भारतीय वस्तू होणार थेट स्वस्त शिवाय दुग्धजन्य पदार्थ..

भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात बघायला मिळाली. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्याने संबंध तणावात आले. अमेरिका एक पाऊस मागे घेत असून भारतावरील टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अखेर टॅरिफ वार संपलाच... अमेरिकेत या भारतीय वस्तू होणार थेट स्वस्त शिवाय दुग्धजन्य पदार्थ..
India-US Trade Agreement
| Updated on: Feb 07, 2026 | 1:46 PM
Share

अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून तणावात दिसले. आता कुठेतरी नक्कीच या संबंधांमध्ये सुधारणा दिसत आहे. भारतावर अमेरिकेने मोठे टॅरिफ लावला. यादरम्यान भारतानेही अमेरिकेविरोधात भूमिका घेतली. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिका भारतावर निर्बंध लादताना दिसली. भारतानेही यावर थेट निर्णय घेत आपले होणारे नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनेक देशांसोबत व्यापार करार केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच मोठी घोषणा करत भारतावरील मुळ टॅरिफ 25 टक्क्याहून 18 टक्क्यांवर आणत असल्याचे म्हटले, त्यामध्येच आता मोठी बातमी पुढे आली असून भारतावरील दंडात्मक 25 टक्के टॅरिफ काढण्याच्या आदेशावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली. म्हणजेच आता भारतावर फक्त 18 टक्के टॅरिफ असणार आहे. भारत-अमेरिका व्यापार कराराची रूपरेषा जाहीर करून एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले, नक्कीच अमेरिकेने टाकले.

भारत-अमेरिका करारात विशिष्ट व्यापार वचनबद्धता समाविष्ट आहेत. दोन्ही देशांकडून सांगण्यात आले की, व्यापार करार पूर्ण झाली आहेत आता फक्त तांत्रिक बाबीवर काम सुरू आहे. कोकिंग कोळसा, विमाने, विमानाचं सुटे भाग, तेल, वायू अशा 500 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तू खरेदी करण्याचे भारताने या करारात मान्य केले आहे. अमेरिका देखील यादरम्यान मोठा निर्णय घेत आहे.

भारत-अमेरिका व्यापार करारांतर्गत अमेरिका भारतातून आयात होणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंवर 18 टक्के टॅरिफ लावतंय. यामध्ये, चामडे, कपडे, चप्पल, सेंद्रिय खते, प्लास्टिक, हस्तकला याचा समावेश प्रामुख्याने आहे. भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर या निर्णयाचे स्वागत केले. भारतीय निर्यातदारांसाठी 30 ट्रिलियन डॉलर्सच्या अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश मिळेल,

याचा फायदा शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमईंला होईल, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले. पियुष गोयल यांनी म्हटले की, मार्चपर्यंत औपचारिक व्यापार करारावर सही होऊ शकते, त्यानंतर भारत अमेरिकन निर्यातीवरील कर कपात लागू करेल. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता अखेर व्यापार करार पूर्ण झाली.

दोन्ही देश काही गोष्टींवर राजी झाले आहेत. आपल्या देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याकरिता भारताने पूर्ण काळजी घेतली आहे. दोन्ही देशातील व्यापार करार सहमती झाल्यानंतर भारतावरील टॅरिफ अमेरिका मागे घेताना दिसत आहे. शिवाय मागील काही दिवसांपासून ताणलेले संबंध आता कुठेही संपत असल्याचेही यावरून स्पष्टपणे दिसत आहे.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप