AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय ज्याची वाट बघत होते ते झालेच, अमेरिकेतून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, थेट आदेशावर सही, 25 टक्के…

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात बघायला मिळत आहेत. आता भारतासाठी अमेरिकेतून मोठी आणि महत्वाची बातमी पुढे येताना दिसत आहे. विशेष म्हणजे या बातमीची प्रत्येक भारतीय वाट पाहत होता.

भारतीय ज्याची वाट बघत होते ते झालेच, अमेरिकेतून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, थेट आदेशावर सही, 25 टक्के...
Donald Trump
| Updated on: Feb 07, 2026 | 8:12 AM
Share

मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात बघायला मिळाली. अमेरिका भारतावर गंभीर आरोप करताना दिसली. फक्त आरोपच नाही तर थेट रशियाचे कपडे धुण्याचे मशिनही भारताला म्हणण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर थेट 50 टक्के टॅरिफ लावला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अतिरिक्त 25 टक्के आणि मुळ टॅरिफ 25 टक्के लावण्यात आला. अमेरिकेने लावलेल्या या टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत होणारी निर्णयात जवळपास बंद झाली. मात्र, यादरम्यान भारताने यामधून मार्ग काढत नुकसान टाळण्यासाठी अनेक देशांसोबत थेट मुक्त व्यापार करार केले. फक्त हेच नाही तर भारताने नुकताच युरोपियन युनियनसोबतही करार केले. आता भारतासाठी अमेरिकेतून अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी येत आहे.

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, भारतावरील मुळ टॅरिफ आम्ही कमी करून 18 टक्क्यांवर आणत आहोत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने लावलेल्या दंडात्मक 25 टक्के टॅरिफबद्दल अत्यंत मोठी अपडेट येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ काढण्याचा आदेश दिला असून त्यांनी त्या आदेशावर सही केल्याचीही माहिती मिळत आहे.

व्हाईट व्हाऊसच्या माहितीनुसार, दोन्ही देशातील व्यापार करार अंतिम टप्प्यात असून जवळपास पूर्ण झाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकारी आदेशावर सही केली. ज्या आदेशात भारतावरील 25 टक्के दंडात्मक टॅरिफ हटवण्याबाबत आहे. भारतावरील 25 टक्के दंडात्मक टॅरिफ कधीही काढला जाऊ शकतो. म्हणजे भारतावर आता फक्त 18 टक्के टॅरिफ असणार आहे.

बांग्लादेशापेक्षाही कमी टॅरिफ अमेरिकेचा भारतावर असेल. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी थांबवल्याचेही सांगितले जात आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध सतत तणावात होते, आता भारतीयांसाठी मोठी आनंदाची बातमी ही नक्कीच आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा परिणाम अनेक क्षेत्रांमध्ये स्पष्टपणे बघायला मिळाला. आता मोठा दिलासा भारतीयांना नक्कीच मिळाला आहे. कोणत्याही क्षणी अमेरिकेतून मोठी घोषणा होऊ शकते.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप