AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hema Malini: वर्ष झालं पण दु:ख कमी होईना..; धर्मेंद्र यांच्यासाठी हेमा मालिनी यांची अत्यंत भावूक पोस्ट, पुनर्जन्माबद्दल लिहिलं..

Hema Malini: हेमा मालिनी यांनी दिवंगत अभिनेते आणि पती धर्मेंद्र यांच्यासाठी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. 'ते केवळ माझे पती नव्हते, तर माझं संपूर्ण अस्तित्व होते', असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील दुःख व्यक्त केलं.

Hema Malini: वर्ष झालं पण दु:ख कमी होईना..; धर्मेंद्र यांच्यासाठी हेमा मालिनी यांची अत्यंत भावूक पोस्ट, पुनर्जन्माबद्दल लिहिलं..
हेमा मालिनी, धर्मेंद्रImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2026 | 12:26 PM
Share

Hema Malini: बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आता पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वर्षभराचा काळ उलटला तरी माझ्या मनातील दु:ख कमी झालेलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेमा मालिनी यांची पोस्ट-

‘एक संपूर्ण वर्ष भराभर निघून गेलं, पण माझ्या मनातील दु:खाची तीव्रता आजही तितकीच आहे. एका अशा व्यक्तीला गमावल्याचं दु:ख मला सतत सतावत आहे, ज्यांचं जाणं ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. ते केवळ माझे पती नव्हते, तर माझं सर्वस्व होते. ते माझे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक होते. माझा आधारस्तंभ होते आणि थोडक्यात सांगायचं तर तेच माझं संपूर्ण अस्तित्व होते. त्यांच्याशिवाय आयुष्य खूप रिकामं वाटतं. त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व, त्यांच्या स्वभावात भिनलेला जन्मजात चांगुलपणा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकावर प्रेमाचा वर्षाव करण्याचा त्यांचा स्वभाव.. ते खरोखरच एक वेगळं व्यक्तिमत्त्व होते. यशाच्या शिखरावर पोहोचूनही ते जमिनीशी घट्ट जोडलेले राहिले आणि आपल्या मातीशी, मुळांशी असलेलं नातं त्यांनी कधीही तुटू दिलं नाही,’ अशा शब्दांत हेमा मालिनी यांनी भावना व्यक्त केल्या.

पहा फोटो-

या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘भगवद्गीतेत सांगितलं आहे की आत्मा अमर आहे आणि त्याचा पुनर्जन्म होतो. मला याची जाणीव आहे. मात्र मी अजूनही याच जन्मात, याच आयुष्यात आहे आणि त्यामुळे त्यांची प्रेमळ सोबत आजही मला प्रकर्षाने आठवते. त्यांनी अनुपस्थिती मनाला सतत जाणवते. या उदार मनाच्या, प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची आठवण काढणाऱ्या आणि धरमजींचं स्मरण करून त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करणाऱ्या लाखो चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते. धरमजी त्यांच्या आयुष्यात चाहत्यांसाठी किती महत्त्वाचे होते, हे सांगणारे तुमचे प्रेमळ संदेश मनाला स्पर्शून गेले. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार,’

या पोस्टसोबत त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही खास आणि यापूर्वी सार्वजनिक न केलेले फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमधून दोघांच्या आयुष्यातील काही खास क्षणांची झलक पाहायला मिळते. धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘फूल और पत्थर’, ‘सत्यकाम’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

Follow Us
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?