AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : सुंदरला 55 ओव्हर, तेच बुमराहच्या वाट्याला फक्त 11 षटकं? शेवटच्या 39 ओव्हरचा हिशोब कोण देणार? जिंकायचा सामना ड्रॉ

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंडमध्ये काल पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. टीम इंडियाने खरंतर ही मॅच जिंकायला पाहिजे होती. कारण भारतीय संघाला 352 धावांची मोठी आघाडी मिळाली होती.

IND vs NZ : सुंदरला 55 ओव्हर, तेच बुमराहच्या वाट्याला फक्त 11 षटकं? शेवटच्या 39 ओव्हरचा हिशोब कोण देणार? जिंकायचा सामना ड्रॉ
Bumrah-Sundar
| Updated on: Nov 24, 2026 | 12:16 PM
Share

वेलिंगटन कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने 368 धावा केल्यानंतर भारताने 720 धावांचा डोंगर उभारला. 352 धावांची मोठी आघाडी भारताकडे होती. भारताची सामन्यावर घट्ट पकड वाटत होती. विजय टप्प्यात आहे असं दिसत होतं. पण टेस्ट क्रिकेट मध्ये फक्त मोठी धावसंख्या उभारुन भागत नाही हे न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतून दिसून आलं. जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमच्या 10 विकेटही काढाव्या लागतात. टीम इंडियाला नेमकं हेच करणं जमलं नाही, त्यामुळे पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. न्यूझीलंडने 120 ओव्हर बॅटिंग केली. दुसऱ्या इनिंगमध्ये पाच विकेट गमावून 239 धावा करुन सामना ड्रॉ केला. डॅरिल मिचेल नाबाद 49 आणि ग्लेन फिलिप्स 26 धावांवर नाबाद राहिले. दोघांनी सहाव्याविकेटसाठी 259 चेंडूत 63 धावा केल्या. दोघांनी भारताच्या हातातून जिंकणारा सामना खेचून नेला. आघाडी फक्त कागदावरच राहिली.

शेवटच्या सत्रातला खेळ सुरु झाला, तेव्हा भारताला विजयासाठी 5 विकेटची गरज होती, 39 ओव्हर बाकी होत्या. यजमान न्यूझीलंड संघाचं लक्ष्य स्पष्ट होतं. काहीही करुन त्यांना हा सामना ड्रॉ करायचा होता. भारताकडे पाच विकेट काढण्यासाठी एक संपूर्ण सेशन होतं. पण मिचेल आणि फिलिप्सने भारतीय गोलंदाजांना कुठलीही संधी दिली नाही. इथे विषय फक्त न्यूझीलंडच्या झुंजार फलंदाजीचा नाहीय, तर भारताची गोलंदाजीची रणनिती आणि कॅप्टनशिपचा सुद्धा आहे.

फिल्डिंगमध्ये बदल करावे लागतात

जेव्हा समोरची टीम विजयाच्या शर्यतीतून बाहेर असते, फक्त ड्रॉ साठी ते खेळतात, तेव्हा विकेट घेण्यासाठी गोलंदाजांना कौशल्य पणाला लावावं लागतं. फिल्डिंगमध्ये बदल करावे लागतात. गोलंदाजीत विविधता आणावी लागते. फलंदाजांना चूका कराला भाग पाडावं लागतं. पण भारतीय गोलंदाजांना न्यूझीलंडची जोडी फोडता आली नाही.

काही प्लान होता का?

वॉशिंग्टन सुंदरने संपूर्ण सामन्यात 55 ओव्हर गोलंदाजी केली. पण दुसऱ्याडावात शेवटच्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या वाट्याला फक्त 11 ओव्हर आल्या. भारताला ज्यावेळी सर्वात जास्त विकेटची गरज होती, तेव्हा गोलंदाजांचा वापर कसा केला गेला?. मिचेल आणि फिलिप्सला आव्हान देण्यासाठी टीम मॅनेजमेंटकडे काही प्लान होता का?. सुंदरच्या हातात सतत चेंडू दिला. पण त्याने निकाल मिळाला नाही. फक्त स्पिनरवरच अवलंबून कसं राहता येईल? बुमराहसारख्या गोलंदाजाचा हुशारीने वापर होणं गरजेचं होतं. ओव्हर पूर्ण करणं आणि विकेट घेणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

Follow Us
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?