
Cocount Oil Freeze: हिवाळ्यात सकाळी सकाळी एक द्रविडी प्राणायाम करावा लागतो. खोबरेल तेल थिजवलेले असते. खोबरेल तेल गोठलेले असते. मग प्लास्टिक अथवा काचेच्या बरणीतील, बाटलीतील थिजलेले खोबरेल तेल काढणे हा मोठा प्रयोग ठरतो.

केसांना लावलेले खोबरेल तेल पण थिजते. त्यामागे एक कारण म्हणजे या तेलामध्ये 90 टक्क्यांपर्यंत सॅच्युरेटेड फॅट असतात. या फॅटची अणूंची रचना एका सरळ रेषेत असते. थंड वातावरणामुळे सरळ रेषेतील अणू जास्त जवळ येतात आणि मग त्यांचा एक बंध तयार होतो. तेलाचे रुपांतर द्रवरुपातून घनरुपात होते आणि ते थिजते.

अजून एक मोठा परिणाम म्हणजे खोबरेल तेलाचा गोठणबिंदू हा इतर तेलांपेक्षा अधिक असतो. खोबरेल तेलाचा साधारणपणे 24 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत असतो. यामुळे खोबरेल तेलाची बाटली पटकन गोठते आणि तेल बाहेर पडत नाही.

खोबरेल तेल पटकन वापरात यावे यासाठी छोट्या तोंडाच्या बाटलीऐवजी मोठ्या तोंडाची बाटली वापरा. लहान तोंडाच्या बाटलीतून खोबरेल तेल बाहेर काढणे अधिक कठीण असते. गरम पाण्यात अथवा गॅसवर थोडं वरते बाटली धरली तर हे तेल विरघळते.

यामध्ये अजून एक उपाय करता येईल. मोठ्या बाटलीऐवजी छोटी बाटली वापरायची. खोबऱ्याच्या तेलात उष्ण तेल टाकायचे. यामध्ये तीळ तेल अथवा बदाम तेलाचा वापर करता येईल. अगदी थोड्या प्रमाणात हे तेल जर बाटलीत ओतले तर खोबरेल तेल लवकर गोठणार नाही.

खोबरेल तेलाची बाटली ही कपाटात अथवा डब्ब्यात ठेवा. ती बाहेर ठेवल्यावर थंडीमुळे लवकर गोठते. त्याऐवजी खोबरेल तेलाची बाटली ही बंद डब्ब्यात अथवा कपाटात ठेवल्यास हे तेल लवकर थिजत नाही अथवा गोठत नाही