सोन्याच्या दुकानात पिवळेच दिवे का असतात? प्रॉफिटच लॉजिक समजून घ्या

दागिन्यांच्या दुकानात गेल्यावर सोन्याची चमक अधिक का जाणवते? पिवळ्या (Warm Lights) दिव्यांचा वापर केवळ सजावटीसाठी नसून त्यामागे मानसशास्त्र आणि व्यावसायिक गणित दडलेले आहे.

| Updated on: Mar 16, 2026 | 12:29 PM
1 / 6
आपण सोने-चांदी खरेदी करण्यासाठी दागिन्यांच्या दुकानात प्रवेश केल्यानंतर तिकडची रोषणाई डोळे दिपवून टाकते. विशेषतः सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानांमध्ये प्रामुख्याने पिवळ्या रंगाच्या (Yellow/Warm Lights) दिव्यांचा वापर केला जातो.

2 / 6
पण हे केवळ सजावटीसाठी नसून, त्यामागे एक शास्त्र आणि व्यावसायिक गणित दडलेले आहे. दागिन्यांच्या दुकानात पिवळ्या लाईट्सचा वापर का केला जातो, याबद्दलची काही प्रमुख कारणे आज आपण जाणून घेऊया.

3 / 6
सोन्याचा मूळ रंग पिवळसर असतो. जेव्हा त्यावर पिवळ्या रंगाचा प्रकाश पडतो. तेव्हा सोन्याची चमक अधिक गडद आणि आकर्षक दिसते. पांढऱ्या प्रकाशात सोने काहीसे फिके किंवा चांदीसारखे दिसत. पण वॉर्म व्हाईट दिव्यांमुळे दागिन्यांवर एक प्रकारची नैसर्गिक झळाळी येते.

4 / 6
सोन्यासारख्या धातूमध्ये प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता असते. पिवळ्या दिव्यांमधील लहरी (Wavelengths) सोन्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित होताना ग्राहकांना ते अधिक प्युअर आणि 'लक्झरी' असल्याचा भास करून देतात. यामुळे दागिन्यांवरील डिझाईन आणि बारीक कोरीव काम स्पष्टपणे उठून दिसते.

5 / 6
कलर सायकोलॉजीच्या अभ्यासानुसार, पिवळा आणि सोनेरी रंग हा समृद्धी, उबदारपणा आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. पिवळ्या दिव्यांमुळे दुकानातील वातावरण प्रसन्न वाटते. ज्यामुळे ग्राहक अधिक वेळ तिथे थांबतात आणि खरेदी करतात.

6 / 6
कधीकधी दागिन्यांवर असणारे अतिशय सूक्ष्म ओरखडे किंवा फिनिशिंगमधील किरकोळ त्रुटी पांढऱ्या प्रखर प्रकाशात लगेच दिसून येतात. याउलट, पिवळसर प्रकाशामुळे धातूमध्ये एक प्रकारची एकसमानता येते, ज्यामुळे दागिना अधिक आकर्षक दिसतो.

Follow Us