
अनेकदा आपल्याला झोपताना बेडखाली किंवा उशीजवळ पाण्याने भरलेला ग्लास ठेवावा, असे सांगितले जातं. पण यामागे एक खास कारण दडलेलं आहे.

बेडखाली पाण्याने भरलेला ग्लास ठेवण्यामागे ज्योतिष, वास्तुशास्त्रांमध्ये विविध कारणे सांगितली आहेत.

बेडखाली पाण्याचा ग्लास ठेवल्याने तुमच्या घरातील आणि तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा त्या पाण्यात शोषली जाते. यामुळे तुम्हाला शांत आणि अधिक चांगली झोप लागते.

जर तुम्हाला झोप येत नसेल, सतत अस्वस्थ वाटत असेल किंवा भयानक स्वप्ने पडत असतील, तर बेडखाली पाणी ठेवा. यामुळे तुम्हाला या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल किंवा तुम्हाला चंद्रदोषाचा त्रास असेल, तर तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी भरून ते पलंगाखाली ठेवावे.

यामुळे शारीरिक ऊर्जा वाढते. तसेच मनाला आराम मिळतो, असे ज्योतिष्यांचे म्हणणे आहे.

बेडखाली किंवा उशाजवळ पाणी ठेवल्याने जलदेवता वरुण देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे जीवनात शीतलता आणि शांती टिकून राहते, असे म्हटले जाते.

जर तुम्ही बेडखाली तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवत असाल तर ते सर्वात उत्तम मानले जाते. कारण तांबे एक शुद्ध धातू आहे. त्यात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते.

झोपताना बेडखाली पाणी ठेवणे हे केवळ एका जुन्या परंपरेचा भाग नसून, त्यामागे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचा विचार दडलेला आहे.

रात्रभर उघड्यावर ठेवलेले पाणी वातावरणातील अनेक घटक शोषून घेते. विशेषतः, नकारात्मक ऊर्जा शोषून घेतल्यामुळे ते पाणी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हवेतील धूळ, सूक्ष्म कण आणि इतर सूक्ष्मजंतू देखील या पाण्यात जमा होऊ शकतात, ज्यामुळे ते पिण्यास अयोग्य ठरते.